आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nicket Lost Vision Five Years Ago Due To Glaucoma, Now He Is The First Ironman In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच वर्षांपूर्वी ग्लुकाेमामुळे गमावली दृष्टी; निकेत देशातील पहिला दिव्यांग आयर्नमॅन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबईतील स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी; ७.४४ मिनिटांत गाठले पूर्ण आव्हान
  • खुल्या गटातून सहभागी हाेऊन पूर्ण केली खडतर अशी स्पर्धा; गटात दुसऱ्या स्थानावर

एकनाथ पाठक | औरंगाबादचांद ताराें के जाे खुद हाे माेहताज,
भीख ना मांगाे उजालाे के बूंद की,
आंखाें से एेसे काम कराे कि
आंखें खुल जाए आंख वालाें की...या प्रेरणादायी ठरलेल्या चार आेळींतून सर्वसामान्यांसाठी देदीप्यमान ठरणारी अशी कामगिरी औरंगाबादच्या दिव्यांग निकेत दलालने केली. एेन उमेदीच्या वयात दुर्दैवाने आघात आेढवला आणि दाेन्ही डाेळ्यांची दृष्टी गमवावी लागली. वयाच्या तिशीत आलेल्या या संकटाने सारे आयुष्यच अंधकारमय झाल्यासारखे वाटले. मात्र, ताे खचला नाही. फीनिक्स पक्ष्यासारखे त्याने स्वत:चे नव्याने अस्तित्व निर्माण केले. दाेन्ही डाेळ्यांच्या अधुपणावर मात करत औरंगाबादचा ध्येयवेडा निकित दलाल गुरुवारी देशातील पहिला दिव्यांग (अंध) आयर्नमॅन ठरला. त्याने दुबई येथे आयाेजित या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर कर्तृत्वाचा झेंडा उंचावला. अंधपणानंतरही त्याने खुल्या गटात सहभागी हाेऊन रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंगच्या तिन्ही गटांत सरस कामगिरी करताना आयर्नमॅनचा किताब पटकावला. त्याने सात तास ४४ मिनिटांमध्ये या विक्रमाला गवसणी घातली. यासह त्याला वर्षभरापासून घेत असलेेल्या मेहनतीच्या बळावर आयर्नमॅन हाेण्याची स्वप्नपूर्ती करता आली. 
दुबई येथे आयाेजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील धावपटूंनी माेठ्या संख्येत सहभाग घेतला हाेता. याच स्पर्धेत विक्रमी कामगिरीच्या बळावर आपला ठसा उमटवण्यासाठी निकेतही सहभागी झाला हाेता. त्याने आेपन गटातील सहभागी स्पर्धकांपेक्षाही सरस कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले.जगातील टाॅप-पाचमध्ये मिळवले स्थान

अंध असूनही आयर्नमॅनचा किताब मिळवण्यासाठी माेठ्या धाडस आणि मेहनतीच्या बळावर निकेतने सहभाग घेतला. दृष्टी गेलेल्यांना हा किताब मिळवता येत नाही, असा अनेकांचा गैरसमज दूर करण्याच्या इराद्याने ताे पेटून उठला. यासाठी दीड वर्ष प्रचंड मेहनत घेतली. याच्याच बळावर अत्यंत खडतर मानली जाणारी ही स्पर्धा पूर्ण करण्याचा त्याने पराक्रम गाजवला. अशा प्रकारे दिव्यांग गटातील ताे पहिला व जगातील पाचवा आयर्नमॅन ठरला. त्याने जगातील टाॅप-५ मध्ये पाचव्या स्थानावर धडक मारली.
 
 
आघातानंतर अवघ्या सहा महिन्यांत नव्याने  सुरुवात; आज ठरताेय सर्वांसाठी प्रेरणादायी
दाेन्ही डाेळ्यांची दृष्टी गेल्यानंतरही निकेतने आेढवलेल्या परिस्थितीसमाेर शरणागती पत्करली नाही. सहा महिन्यांत ताे या आघातातून पूर्णपणे सावरला. २०१५ मध्ये ग्लुकाेमाच्या आजारामुळे दाेन्ही डाेळ्यांची दृष्टी निकामी झाली. त्यामुळे सारे काही संकटासारखेच आेढवले हाेते. मात्र, यावरही मात करत निकितने इतरांचे जीवनमान प्रकाशित करण्याचा जणू विडाच उचलला. त्याने यानंतरही खचलेल्या आणि खासकरून शेतकरी कुटुंबीयांना माेटिव्हेट करणारे लेक्चर देण्यास सुरुवात केली.  याशिवाय सध्या त्याचे काम हे इतर सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरणारे आहे.वर्षभरातील  प्रचंड मेहनतीतून गाठला किताबाचा पल्ल


आयर्नमॅनसाठीची अत्यंत खडतर असलेली स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निकित दलालने प्रचंड मेहनत घेतली. वर्षभरात त्याने हा यशाचा माेठा पल्ला गाठला. यासाठी नित्यनेमाने पहाटे ५ वाजेपासून त्याने सरावाला सुरुवात केली. यादरम्यान जलतरणासह ताे इतरांच्या मदतीने धावणे आणि सायकलिंगचा सराव करू लागला. वर्षभरातील मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले. शहरातील सिद्धार्थ गार्डन येथे त्याने जलतरणासाठीचा सराव केला. त्याला काेच अभय देशमुख यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर सायकलिंग आणि रनिंगमध्येही ठसा उमटवला.यशासाठी जिद्दीला मिळाली इतरांची माेलाची साथ


डाेळ्यांच्या अधुपणानंतरही निकेतने  वेगळे काही तरी करून दाखवण्याची आपली जिद्द साेडली नाही. सातत्याने वेगळे काही करण्यासाठीच त्याची धडपड कायम राहिली. यातूनच त्याने आर्यनमॅनचा किताब पटकावण्याचा निर्धार केला. यासाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द त्याला फायदेशीर ठरली. 

कमरेला बेल्ट लावून रनिंगचा नित्यनेमाने सराव, गाठले यश


रनिंगचा सराव करताना निकेतने आपल्याच सहकाऱ्याची मदत  घेतली. यासाठी वेगळीच कल्पना त्याला सुचली. यातूनच त्याने स्वत:च्या कमरेला एक बेल्ट लावला आणि हाच बेल्ट सहकाऱ्याच्याही कमरेला लावला. यातूनच त्याला धावण्याचा सराव करता आला.यासाठी मात्र त्याला सातत्याने  इतरांची मदत घ्यावी लागली.