आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्स एन्जॉय करत होते पार्टी, घडले असे काही की दोन गायिकांमध्ये पेटली वादाची ठिणगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिसः हॉलिवूडच्या पॉप सिंगर्स निकी मिनाज आणि कार्डी बीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघी एकमेकांनी बेदम चोप देताना दिसत आहे. ही घटना शुक्रवारी हार्पर्स बाजार आयकन्स फॅशन वीक पार्टीत घडली. दोन्ही गायिका या पार्टीत हजर होत्या. पार्टीत उपस्थित सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. पार्टी ऐन रंगात असताना निकी आणि कार्डी बी यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्डी फोटो काढत असताना अचानक निक्की तिच्या मध्ये आली होती. तिच्या धक्क्याने कार्डीला दुखापत झाली. यावरुन दोघींमध्ये चांगलेच भांडण झाले. कार्डीने तर चक्क बूट काढून निक्कीवर फेकला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, निक्की जेव्हा पार्टीतून बाहेर पडली तेव्हा तिच्या कपाळावर सूज आली होती.

बातम्या आणखी आहेत...