आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दयाबेननंतर आता अजून एक अभिनेत्री सोडतेय तारक 'मेहता का उल्टा चश्मा' शो सोडण्यामागे आहे मोठे कारण, भिडे मास्टरच्या मुलीच्या भूमिकेत दिसते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. टीव्हीचा प्रसिध्द शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यापुर्वीच शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकाणीने शो सोडला आहे. आता मालिकेतील अजून एक अभिनेत्री शो सोडणार असल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री निधी भानुशालीनेही हा शो सोडला आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये भिडे मास्टरची मुलगी सोनूची भूमिका साकारणा-या निधीने हा शो सोडला आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार निधीने आपल्या अभ्यासामुळे हा शो सोडत आहे. मालिकेत निधी भानुशाली उत्तम भूमिका साकारत होती. निधीपुर्वी या मालिकेत सोनूची भूमिका झील मेहता साकारत होती. झीलने या मालिकेत जवळपास 6 वर्षे काम केले. पण काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली होती. 

 

निधीच्या एक्जिट एपिसोडची प्लानिग करत आहेत मेकर्स 
- निधी भानुशाली सध्या मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून आपले ग्रॅज्यूएशन पुर्ण करतेय. निधीन अभ्यासात खुप हुशार आहे. निधी नेहमी सेटवर अभ्यास करताना दिसत असते. निधीला आता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. 
- या वृत्तानंतर मालिकेचे मेकर्स निधीला रिलॅक्सेशन देण्याच्या मूडमध्ये आहेत. निर्मात्यांना वाटते की, निधीने शूटिंगसाठी कमी वेळ देऊन अभ्यासावर फोकस करावा. 
- वृत्तांनुसार निधी आपल्या निर्णयावर ठाम आहे. यानंतर आता मेकर्स एक एक्जिट एपिसोडची प्लानिंग करत आहेत. यामुळे ते निधीच्या पात्राला मालिकेतून रामराम ठोकू शकतील. 

बातम्या आणखी आहेत...