आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - बिहारमध्ये अतिवृष्टीनंतर राजधानी पाटण्यातील 80 टक्के घरांमध्ये पाणी शिरले आहे. यातून बिहारचे उप-मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी सुद्धा सुटलेले नाहीत. त्यांना देखील मदतीची गरज पडली. अशात एका विद्यार्थिनीचा फॅशन फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. पाटण्यातील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीची ही विद्यार्थिनी पाटण्यातील पूरग्रस्त रस्त्यांवर उतरली. अदिती सिंह नामक या विद्यार्थिनीने लाल ड्रेसमध्ये फोटोशूट केला. सोशल मीडियावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
फोटोग्राफर सौरभ अनुराजने हा फोटोशूट सोशल मीडियावर अपलोड केला. त्यावर 'मरमेड इन डिजॅस्टर' असे कॅप्शन दिले. अदिती आणि अनुराजच्या मते, या फोटोशूटचा हेतू केवळ पाटण्याची परिस्थिती दाखवणे आहे. त्याचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. इंस्टाग्रामवर या फोटोशूटला हजारो लाइक मिळाले आहेत. कठिण परिस्थितीतही या फोटोंनी हसणे शिकवले अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. तर काहींनी या फोटोशूटवर तीव्र संताप व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.