आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईट वॉक, रातरागिणी म्हणताहेत, आम्ही होणार सहभागी, तुम्हीही व्हा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर : 'अंधारात चालून जाणार' या 'दिव्य मराठी'च्या उपक्रमाला नगर शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (२२ डिसेंबर) रात्री ९ वाजता प्रेमदान चौकातून निघणाऱ्या नाईट वॉकमध्ये आम्ही सहभागी होत अाहोत. ज्या शहरात महिला रात्री सुरक्षित रस्त्यावर फिरू शकतात, ते शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचे मानले जाते. मात्र, भारतीय घरांतून अाजही अनेक महिलांना इच्छा असून रात्री त्या घराबाहेर पडू शकत नाहीत. यामागे असते ती तिच्या वडील, नवऱ्याकडून तिच्या सुरक्षिततेबाबत केली जाणारी काळजी. अत्याचारांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कायद्यांएवढीच महत्त्वाची भूमिका असते ती प्रत्येक नागरिकाने अापली कायदेशीर जबाबदारी अाेळखून वागण्याची. महिला शहरात सुरक्षित असल्याचा अात्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा याकरिताच 'दिव्य मराठी'ने वर्षातील सर्वात माेठी रात्र म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या २२ डिसेंबरच्या रात्री रातरागिणी नाईट वाॅकचे अायाेजन केले अाहे. या वाॅकमध्ये सर्वच क्षेत्रांतील महिला माेठ्या संख्येने सहभागी हाेणार असून महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे.

रातरागिणींनी ही काळजी घ्यावी

- महिलांनी शक्यतो महागडे दागिने घालून येऊ नये.
- महागड्या वस्तू व रोकड व्यवस्थित सांभाळाव्यात.
- आपापल्या मोबाइल व पर्सची काळजी घ्यावी.
- पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
- सोबतच्या रातरागिणींना सोडू नये, चुकामूक होणार नाही.
- कार्यक्रमानंतर निघताना मैत्रिणींसोबत निघावे.
- ग्रूपने येत असाल, तर सामूहिक वाहन वापरावे.
- प्रोफेसर चौक परिसरातील रातरागिणींनी गर्दी कमी झाल्यानंतर निघावे.
- पायी चालताना कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत.
- आपल्यामुळे वाहतुकीत अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना (रुग्णवाहिका) तत्काळ रस्ता द्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क

रविवारी रात्री ९ वाजता प्रेमदान चाैकातून मशाल पेटवून नाईटवॉक सुरू होईल. तेथून पायी चालत प्रोफेसर कॉलनी चौकात येतील. तेथे उपक्रमाची माहिती देऊन पथनाट्य सादर होईल. महिलांना सुरक्षेचे उपाय सांगितले जातील. हा उपक्रम सर्व महिला, युवतींसाठी आहे. रातरागिणींचा नाईटवॉक' लोगो मिळवण्यासाठी, या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी महेश पटारे (मो. ८३९०९०६१००) व प्रियंका चिखले (मो. ९८५०२०८१००) यांच्याशी संपर्क साधावा.

तातडीच्या मदतीसाठी 'दिव्य मराठी टीम'शी संपर्क साधा... 

रिपोर्टर अरुण नवथर - ९१५८८८१६११ दीपक कांबळे - ९५६११५९५०५
बंडू पवार - ९३४००६१८२६ अनिल हिवाळे - ९७६३६१३९८९
गणेश देलमाडे - ९८२२९४९४३८ भूषण देशमुख - ९८८१३३७७५
अनिरुद्ध देवचक्के - ९८९०६६४७७९ प्रियंका चिखले - ९८५०२०८१०० प्रमोद गवळी - ९८२२७७१८१७ संजय गाडीलकर - ९९२२४२७७९०.
रामदास बेंद्रे - ८८८८८५१२३० एकनाथ मोरे - ८८८८५७९८५७
पराग देशपांडे - ८३९०९०४२१३ अिभनंदन गायकवाड - ८४२१८६१५०५
मारुती घुले - ८३९०५६९५१३ सचिन सपकाळ - ७०५८८३८२४५
रवींद्र कोष्टी - ८३९०९०५४४० महेश वारंगुळे - ८८०६०३४९३९
गोदाजी वाकोडे - ९६८९१३१३१२ निखिल रासने - ९८८१८१५१२३
वैद्यकीय मदतीसाठी - १०८ तोफखाना पोलिस - ०२४१ - २४१६११८.

यांच्या हस्ते पेटतील मशाली
 

हिराताई शेळके (धर्मादाय आयुक्त, नगर) विजयामाला माने (महिला व बालविकास अधिकारी, नगर) संध्या मेढे (उर्जिता फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्त्या)
डॉ. सुधा कांकरिया (बेटी बचाव मोहीम).

असा आहे रातरागिणी नाईटवॉक कार्यक्रम

रात्री ९ वाजता प्रेमदान चौकात एकत्र आल्यानंतर मशाली पेटवून प्रोफेसर चौकाकडे पायी चालत निघायचे. प्रोफेसर चौकात येऊन गर्दी न करता बसावे. सुरुवातीला दिव्य मराठीचे ब्युरो चिफ अनिरुद्ध देवचक्के चला बोलू, मौन सोडू' या अभियानाची माहिती देतील. त्यानंतर समर्थ शाळेच्या विद्यार्थिनी स्त्री सक्षमीकरणावर पथनाट्य सादर करतील. यानंतर अग्नेय गुरुकूल शाळेचे विद्यार्थी महिला सुरक्षाविषयी स्कीट सादर करतील. यानंतर डॉ. सुधा कांकरिया 'बेटी बचाव'ची सामूहिक शपथ देतील. नंतर गोल्ड जिम व फिटनेस क्लबतर्फे स्वप्नाली जंबे व सहकारी फ्लॅशमॉब सादर करतील. नंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. हा उपक्रम सर्व महिला, युवतींसाठी आहे. त्यामुळे यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'दिव्य मराठी'च्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...