Home | News | Niharika Singh Shared her Metoo Story and mentioned Nawazuddin siddiqui

#Metoo/ अभिनेत्री निहारिका सिंहने नवाजुद्दीनवर लावले सेक्शुअल हरॅशमेंटचे आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 04:13 PM IST

निहारिकाने भूषण कुमारवरही लापले आरोप

 • Niharika Singh Shared her Metoo Story and mentioned Nawazuddin siddiqui

  बॉलिवूड डेस्क. #Metooच्या माध्यमातून आता बॉलिवूड अॅक्टर नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. पूर्व मिस इंडिया अर्थ आणि बॉलिवूड अभिनेत्री निहारिका सिंहने सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाजवर आरोप लावले आहेत. निहारिकाने आपला एक्स बॉयफ्रेंड नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच प्रोड्यूसर भूषण कुमारवरही गंभीर आरोप लावले आहे. जर्नलिस्ट संध्या मेननने अनेक ट्वीट केले, यामध्ये निहारिकाची #Metoo स्टोरी शेअर केली आहे. निहारिकाने आपल्या मॉडल बनण्याचा एक्सपीयरिन्स आणि अभिनेत्री म्हणून केलेल्या स्ट्रगलविषयी सांगितले आहे.


  निहारिकाची #Metoo स्टोरी
  1. निहारिकाने सांगितले की, एका सकाळी मी घरी होती, नवाज रात्रभर शूटिंग करुन परतला होता. तो माझ्या घराच्या शेजारीच राहायचा. मी त्याला ब्रेकफास्टसाठी घरी बोलावले. मी गेट उघडले तेव्हा नवाजने मला जोरात पकडले. मी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि कशीबशी तिथून सुटले. या नात्याचे काय करावे हे मला कळत नव्हते. नवाज मला म्हणाला की, परेश रावल आणि मनोज वायपेयीच्या पत्नी प्रमाणे माझी पत्नीही मिस इंडिया किंवा अभिनेत्री असावी असे मला वाटते. निहारिकाने सांगितले की, नवाज अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे मला खुप उशीरा कळाले. तो सर्वांना वेगवेगळ्या कहाण्या सांगतो. एकानंतर एक खोटे उघड झाल्यामुळे मी ते नाते संपवले.

  2. निहारिकाने भूषण कुमारवरही लापले आरोप
  निहारिकाला पहिला चित्रपट कसा ऑफर झाला याविषयी तिने सांगितले. तिने लिहिले की, - भूषण कुमारने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि आपल्या 'A New Love Ishtory' या चित्रपटासाठी साइन केले. त्याने मला एक लिफाफा दिला. यामध्ये 2 पाचशेच्या नोट होत्या. यानंतर रात्री त्याने मला मॅसेज केला की, - मला तुझ्याविषयी अजून काही जाणुन घ्यायचे आहे. आपण काही वेळ एकत्र घालवू शकतो का. यावर मी उत्तर दिले की, - हो का नाही, आपण डबल डेटवर जाऊ. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन या मी माझ्या बॉयफ्रेंडला घेऊन येते. यानंतर भूषणचा काहीच रिप्लाय आला नाही.

  3. नवाजने आपल्या बायोग्राफीमध्ये निहारिकाचा उल्लेख केला होता
  नवाजने अक्टोबर 2017 मध्ये आपल्या एन ऑर्डिनरी लाइफ या बायोग्राफीमध्ये खुलासा केला होता की, सेक्ससाठी त्याने निहारिकाचा वापर केला. यावर निहारिका म्हणाली होती की, नवाजुद्दीन सिद्दिकी आपले पुस्तक विकावे यासाठी एका महिलेला बदनाम करत आहे. निहारिकाच्या स्टेटमेंटनुसार - मी नवाजसोबत 2009 मध्ये फिल्म मिस लव्हलीच्या शूटिंग दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते, हे काही महिने सुरु होते. यामुळे ते माझा अशा महिलेच्या रुपात उल्लेख करत आहेत. हे पाहून हसू येते. नवाजने रिलेशनशिपची कहाणी बदलून लिहिली. त्यांनी माझ्या परवाणगीशिवाय काय लिहिले याविषयी मला माहिती नाही.

 • Niharika Singh Shared her Metoo Story and mentioned Nawazuddin siddiqui
 • Niharika Singh Shared her Metoo Story and mentioned Nawazuddin siddiqui

Trending