आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलेश राऊत, सुरजितसिंग खुंगर, फारूकी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आगामी निवडणुक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल ३१ प्रवक्त्यांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांच्यासह तीन प्रदेश प्रवक्ते आणि २७ जिल्हा प्रवक्त्यांचा यात समावेश आहे. 


नाशिक जिल्ह्यातील आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण आणि संजय खोडके यांच्याकडे प्रदेश प्रवक्ते तर, सुरज चव्हाण यांची प्रवक्ता समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या यादीत ८ नवीन चेहऱ्यांना संधी दिली मिळाली आहे. तसेच लोकसभा मतदार संघानिहाय जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याही फेररचना करण्यात आल्या आहेत. 


जिल्हानिहाय प्रवक्ते 
मुंबई - विद्या चव्हाण, राहुल नार्वेकर, चित्रा वाघ, क्लाईड क्रास्टो, अदिती नलावडे, महेश चव्हाण, डॉ.दलवाई. 
पुणे - अंकुश काकडे, चेतन तुपे, जयदेव गायकवाड, विकास लवांडे, विजय कोलते, भूषण राऊत 
ठाणे - आनंद परांजपे, महेश तपासे 
औरंगाबाद- सुरजितसिंग खुंगर, नीलेश राऊत, उमर फारुकी. 
अकोला - डॉ.आशाताई मिरगे. नाशिक- विश्वास ठाकूर, डॉ. पवार. 
बीड - उषा दराडे, अमरसिंह पंडीत 
उस्मानाबाद- सक्षणा सलगर सोलापूर - उमेश पाटील 

बातम्या आणखी आहेत...