आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेंनी मागितली माफी, महापुरुषांच्या फोटोचा गैरवापर केल्याचा झाला होता आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'चला हवा येऊ द्या' हा शो अलीकडच्या भागात प्रसारित झालेल्या एका दृश्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीने करत त्याजागी भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो फोटोशॉप करून लावण्यात आला होता. यावरून महापुरुषांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत छत्रपती संभाजीराजे यांनी निलेश साबळे यास माफी मागण्यास सांगितले होते. असे न केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला होता. 

मात्र याच्या अगदी २४ तासांच्या आतच आज निलेश साबळेने एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. "महापुरुषांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू या आधी किंवा आता तसेच यापुढे सुद्धा नव्हता आणि नसेल मात्र तांत्रिक बाबीतून झालेल्या चुकीसाठी क्षमस्व आहे." असे निलेशने व्हिडीओ मध्ये सांगितले आहे. निलेश साबळेने व्हिडिओतून माफी मागितली आहेच पण त्या सोबतच स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता असेही स्पष्ट केले.बातम्या आणखी आहेत...