आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध तत्काळ हटवण्याबाबत आदेश देण्यास सुुप्रीम कोर्टाने मंगळवारी नकार दिला. कोर्ट म्हणाले, राज्यातील स्थिती खूप संवेदनशील आहे. ती सर्वसामान्य करण्यासाठी सरकारला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथे जीवितहानी न होण्याची काळजी घेणे. कलम ३७० हटवल्यानंतर केंद्राने जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेले निर्बंध दडपशाही असल्याचे सांगत काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
स्थिती सुरळीत होण्यास काही िदवस लागतील : कोर्ट
कोर्टाने केंद्राची बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना विचारले की स्थिती सुरळीत होण्यास किती वेळ लागेल? त्यावर वेणुगोपाल म्हणाले की,जुलै २०१६ मध्ये बुरहान वानी या दहशतवाद्याचे एन्काउंटर झाल्यानंतर स्थिती सुरळीत होण्यास तीन महिने लागले होते. सीमेपलीकडून या अतिरेक्यांना निर्देश मिळतात. त्यामुळे स्थिती सुरळीत होण्यास काही दिवस लागतील.
केवळ वंशवादी नेते आणि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारेच विरोध करताहेत : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, कलम ३७० आणि ३५ अ ने जम्मू-काश्मीरच्या लोकांना बेड्यांत जखडले होते. अाता लोक स्वत:च दैव लिहितील. फक्त स्वार्थी गट, वंशवादी नेेते आणि दहशतवाद्यांशी सहानुभूती असणारेच कलम ३७० हटवण्यास विरोध करताहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.