आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - सत्ताधारी भाजपच्या भांडणात 'दत्तक नाशिक'ची हाेणारी पिछेहाट व बदनामी थांबवण्यासाठी व प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी तडकाफडकी नियुक्त केलेले महापालिकेचे अायुक्त तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी करण्यात अाली अाहे. ते मंत्रालयामध्ये नियोजन विभागात सहसचिव म्हणून जात आहेत. प्रशासकीय हिताबराेबरच अनेक चांगल्या निर्णयांमुळे सुरुवातीला नाशिककरांच्या काैतुकास पात्र ठरलेल्या मुंढेंना नंतर तुघलकी करवाढीमुळे त्यांचा राेष अाेढवून घ्यावा लागला.
नगरसेवकांची अकारण काेंडी केल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठरावही अाणला गेला हाेता; मात्र मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून अविश्वासाची नामुष्की टाळली; परंतु अखेर बैचेन स्वकियांना दिलासा देण्यासाठी त्यांची बदली करण्यात अाली. तूर्तास त्यांनी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे दिला अाहे. दरम्यान, सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा नाशिकमध्ये यापूर्वी विविध पदांवर काम केलेल्या राधाकृष्ण गमे यांची अायुक्तपदावर नियुक्ती झाल्याचे बाेलले जात असले तरी, अद्याप त्यांनाही अधिकृत अादेश नसल्याचे समजते. साेमवारी हा अादेश जारी हाेण्याची शक्यता अाहे.
७ फेब्रुवारी २०१८ राेजी महापालिकेत मुंढे यांना पाठवण्यात अाले. तत्कालीन अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी चांगले काम केले असतानाही केवळ भाजप अामदारांमधील वादात त्यांची बदली करण्यात अाली. भाजपच्या अंतर्गत वादात मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची बदली हाेत असल्यामुळे प्रशासकीय शिस्तीबराेबरच पक्षावरही नियंत्रण ठेवेल अशा अायुक्ताची गरज मुख्यमंत्र्यांना वाटत हाेती. त्यातून मुंढे यांना पाठवल्याची चर्चा हाेती; मात्र उर्वरित. पान ३
बदलीचे अादेश मिळाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी तत्काळ महापालिका कार्यालय साेडले.
२० लाख लाेकसंख्या; ४० समर्थकांची केविलवाणी धडपड; १७ जणांवर गुन्हे
सुमारे २० लाख लाेकसंख्येपर्यंत पाेहाेचलेल्या नाशिक शहरातील सामान्य जनतेमध्ये करवाढीसह अन्य मुद्यावरून प्रचंड असंताेष हाेता. मात्र, साेशल मीडियावरून एक विशिष्ट गट 'मी नाशिककर' या झेंड्याखाली 'सपाेर्ट मुंढे' माेहीम राबवत हाेता. गुरुवारी सकाळी १० वाजता या गटाने मुंढे यांच्या समर्थकांना एकत्र येण्याची हाक दिली हाेती. प्रत्यक्षात, ३५ ते ४० लाेक या ठिकाणी समर्थनासाठी जमा झाले हाेते. त्यातही बघ्यांचीच संख्या अधिक हाेती. या गटाने प्रथम पालिका प्रवेशद्वारावर निदर्शने करीत मुख्यमंत्री, पालकमंत्री, भाजप अामदार व महापाैरांच्या निषेधाच्या घाेषणा दिल्या. त्यानंतर पालिका प्रवेशद्वारातून अात घुसून मुख्य इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. येथेही घाेषणाबाजी, ठिय्या अांदाेलन केले.
पाेलिसांनी तेथे धाव घेत त्यांना खाली अाणले. त्यानंतरही घाेषणाबाजी सुरूच हाेती. विनापरवानगी माेर्चा काढणे, पालिकेची सुरक्षितता भेदून अात जाण्याचा ठपका ठेवत त्यातील १७ समर्थकांना ताब्यात घेतले. उर्वरित समर्थक कारवाईच्या भीतीने पसार झाले. या माेर्चात डांबराशी संबंधित कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या कुटुंबियांची उपस्थिती चर्चेत हाेती. दरम्यान, पाेलिसांंनी पकडलेल्या समर्थकांची सायंकाळी जामिनावर सुटकेसाठी धडपड सुरू हाेती.
'रामायण'समोर फटाके फाेडत भाजपचा जल्लाेष
मुंढे यांच्या बदलीचे अादेश अाल्यानंतर महापाैरांच्या 'रामायण' या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फाेडून अानंद व्यक्त केला. काहींनी पेढ्यांचेही वाटप केले. महापालिकेतही असेच चित्र हाेते. काही विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून जल्लाेष केला.
पाेलिसांची परवानगी न घेता थेट पालिकेत घुसल्यामुळे मुंढे समर्थकांना जाब विचारताना पाेलिस.
बदलीमागे ही तीन कारणे चर्चेत
२१ काेटी रुपयांचे वादग्रस्त भूखंड माेबदला प्रकरण मुख्यमंत्र्यापर्यंत पाेहाेचले हाेते.
तीन हजार प्रकरणांतून विखे पाटील शाळेचे प्रकरण सूडबुद्धीने बाहेर काढल्याचा अाक्षेप.
पालकमंत्र्यांच्या हस्ते नेहरू उद्यानाच्या अपेक्षित उद्घाटनावर पाणी फेरले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.