आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - दूध भुकटी प्रकल्प व पन्नास हजार लिटर प्रतीदिन क्षमतेच्या दूध शाळेच्या विस्तारीकरणासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लोकमंगल मल्टिस्टेट को ऑप. सोसायटी, बीबी दारफळचे तत्कालिन संचालक रोहन सुभाष देशमुख यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले, त्यापैकी पाच कोटी रुपये बँकेच्या खात्यात जमा झाले होते. राेहन देशमुख हे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पूत्र अाहेत.
लोकमंगल मल्टिस्टेट को ऑप दूध भुकटी निर्मिती आण विस्तारीत दुग्ध शाळेचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंदाजपत्रकातील दरसूची डीसआरप्रमाणे असल्याबाबतचे पत्र, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे प्रमाणपत्र, अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र, कारखाना अधिनियम परवाना नोंदणी प्रमाणपत्र ही प्रमाणपत्रे सादर केली होती. दक्षिण सोलापूर मंद्रूप येथील आप्पाराव कोरे यांनी ही कागदपत्रे बनावट व खोटी असल्याची तक्रार दूग्ध व्यवसाय विभागाकडे केली होती. यानंतर संबंधित विभागाने चौकशी केली. त्यात कागदपत्रे बनावट असल्याचे समाेर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.