National Crime / 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करून केली निघृण हत्या, पोलिसांना नाल्यामध्ये सापडला मृतदेह


शनिवारी रात्री 8 वाजता मुलगी घराजवळील दुकानत सामान आणण्यासाठी गेली होती
 

दिव्य मराठी वेब

दिव्य मराठी वेब

Jun 09,2019 01:02:47 PM IST

भोपाळ(मध्यप्रदेश)- येथील कमला नगर परिसरात रविवारी सकाळी 9 वर्षीय मुलीचा नाल्यात मृतदेस आढळला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. मुलगी शनिवारी रात्री 8 वाजता बेपत्ता झाली होती. मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत केले आहे.


मिळालेल्या माहिनुसार, मंडवा परिसरात राहणारी मुलगी शनिवारी रात्री 8 वाजता घराजवळील दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही, म्हणून घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. खूप शोधूनही ती सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या परिसरातील नगरसेवगाला या गोष्टीची माहिती झाली, तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन करून तत्काळ मुलीचा तपास घेण्यास सांगितले. पोलिसांनी तपास सुरू केला, पण दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह त्याच परिसरातील नाल्यामध्ये सापडला.


मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहचल्या प्रज्ञा ठाकूर
ए.एस.पी. अखिल पटेल यांनी सांगितले की, मुलीच्या बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई न केल्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत केले आहे. त्यांनी सांगितले की, कुटुंबीय आणि परिसरातील लोकांची चौकशी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेल्या.

X
COMMENT