आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी जीव धोक्यात : नऊवर्षीय मुलगी पडली विहिरीत; पाणी कमी असल्याने वाचला जीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभार पिंपळगाव - घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावात येणाऱ्या टँकरवर तहान भागत नसल्यामुळे विहिरीवरून पाणी शेंदून तहान भागवावी लागत आहे. दरम्यान, नऊ वर्षीय मुलगी पाणी आणण्यासाठी गेली असता तोल जाऊन ती विहिरीत पडली. परंतु विहिरीत  पाणी कमी असल्यामुळे तीचा जीव वाचला.  तरुणांनी विहिरीत उतरून दोरखंडाच्या आधारे त्या मुलीस बाहेर काढले. रेणुका रमेश शिंदे (९) असे जखमी मुलीचे नाव आहे. 


दर दिवसाला गावात पाण्याच्या दोन ट्रिप करण्यात याव्यात, असे एसएमएस प्रत्येक दिवशी गाडी मालक दीपक मुंडे यांना टाकण्यात आले. परंतु मुंडे हे गावामध्ये एकच पाण्याचे एकच टँकर टाकत असल्यामुळे गावात पाणीटंचाई जाणवत आहे. रेणुका शिंदे ही मुलगी पिण्याचे पाणी नसल्याने विहिरीवर पाणी शेंदण्यासाठी गेली होती. या वेळी तोल जाऊन ती विहिरीत पडली. ही बाब काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी विहिरीत उतरून तिला दोरखंडाने वर आणले. विहिरीत कमी पाणी असल्याने तिचा जीव वाचला. गावात दोन टँकर सुरू असते तर  मुलीला विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागले नसते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. 


दरम्यान, या प्रकाराविषयी पंचायत समिती घनसावंगी अधिकारी नारायण राठोड यांच्याशी सर्जेराव जाधव यांनी संपर्क केला. गावांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. यासंबंधी गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना आपण एसएमएस, व्हाॅट्सअपवर कळवले असल्याचे राठोड यांनी सांगितले. मुलीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी संतोष जाधव, बळीराम पुरुळे, अंकुश वाघमारे, सुनील ठाकर, करण पुरुळे, मधुकर पुरुळे यांनी परिश्रम घेतले.