आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nine Years Later, In 'InshaAllah' Hrithik Bhansali Reunited, Salman Was Going To Be The Part Of Movie First.

नऊ वर्षांनंतर ‘इंशाअल्लाह’ ने झाले ऋतिक-भन्साळींचे रीयूनियन, आधी सलमान बनणार होता या चित्रपटाचा भाग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागील अनेक दिवसांपासून संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट 'इंशाअल्लाह' च्या कास्टिंगबद्दल चर्चा सुरु आहे. आता याबद्दल ऋतिक रोशनचे नाव समोर येत आहे. भन्साळी आणि ऋतिक रोशनने 2010 मध्ये ‘गुजारिश’ चित्रपटात एकत्र काम केले होते. आता दोघे नऊ वर्षांनी 'इंशाअल्लाह' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच फ्लोअरवर जाणार होता. यामध्ये पहिल्यांदा सलमान खानला आलिया भट्टच्या अपोजिट कास्ट केले गेले होते.  मात्र बजेट्स आणि डेट्समुळे हा चित्रपट सध्या अडकला आहे. 
सलमान प्रोजेक्टमधून बाजूला झाल्यानंतर रिप्लेसमेंटवर काम सुरु आहे आणि आता भन्साळीच्या प्रोडक्शन हाउसशी निगडित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, चित्रपटासाठी ऋतिकला अप्रोच केले गेले आहे आणि त्याला चित्रपटाची कथादेखील आवडली आहे. या चित्रपटासाठी आधीपासूनच शाहरुख खान, रणवीर सिंह आणि रणबीर कपूर यांच्या नावांची प्रबळ शक्यता आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की, चित्रपटाची अनाउंसमेंट केव्हा आणि कुणाच्या नावासोबत होईल. ऋतिकच्या नावावर शोध का थांबला आहे.... 
ट्रेड जगतात चर्चा आहे की, ‘सुपर 30’ च्या यशामुळे ऋतिक रोशनच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे. 
बिग बजेट चित्रपट ‘वॉर’ च्या ट्रेलरमध्येदेखील त्याचा लूक लोकांना आवडत आहे. 
‘इंशाअल्लाह’ देखील एक मेगाबजेट चित्रपट आहे आणि भन्साळींना यासाठी एका मोठ्या स्टारची गरज आहे. जो त्यांची रिकव्हरी सुनिश्चित करू शकेल.  असा आहे ऋतिकचा फ्यूचर प्लॅन... 
ऋतिकने अद्याप इतर प्रोजेक्ट्सपैकी फराह खान आणि रोहित शेट्टी यांच्या चित्रपटाला होकार दिलेला नाही. 
राजकुमार गुप्ताचा 'स्पाय' चित्रपटाला देखील त्याने नाकारले आहे. 
‘वॉर’ रिलीज झाल्यानंतर ‘क्रिश’ च्या तयारीला लागण्यासाठी त्याला पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 
याचदरम्यान ज्या डेट्स त्याच्याकडे आहेत त्यामध्ये तो ‘इंशाअल्लाह’ वर काम करू शकतो.  
 
 

भन्साळींसाठी काय असेल फायदेशीर... 
भन्साळींना ऋतिकच्या बल्क डेट्स मिळत आहेत आणि हेच त्यांना हवे होते. 
आलियासोबत ऋतिकची जोडी फ्रेशदेखील असेल. 
यासाठी लोकांमध्ये तेवढाच उत्साह असेल जेवढा आलियाला सलमानसोबत पाहण्यासाठी होता.  

बातम्या आणखी आहेत...