आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींचा नीरव मोदीचा बंगला दीड कोटी खर्चून पाडला; 110 डायनामाइट, 30 किलो इतर स्फोटकांचा केला वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिरे व्यापारी व पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा कोकणातील अलिबागच्या समुद्रकिनारी बेकायदेशीरपणे उभा आलिशान बंगला शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली. मोदीच्या या बंगल्याविरोधात २००९ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. मुंबईपासून १५० किमी अंतरावर १९८५ मध्ये हा बंगला होता. मोदीने देश सोडताच ईडीने हा बंगला जप्त केला. त्यानंतर हायकोर्टाने बंगला पाडण्याचे आदेश दिले होते. 


मौल्यवान साहित्याचा लिलाव - पीएनबी बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी फरार आहे. सरकार आणि ईडीने त्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ईडीने घरातील मौल्यवान सामान लिलावासाठी ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...