आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 किलो डायनामाइटने जमिनदोस्त केला नीरव मोदीचा 100 कोटी रुपयांचा बेकायदा बंगला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हीरे व्यापारी नीरव मोदीचा अलीबाग येथील बंगला शुक्रवारी जमिनदोस्त करण्यात आला. बंगला पाडण्यासाठी 30 किलोग्रॅम डायनामाइटचा वापर करण्यात आला. समुद्र किनार्‍यावर असलेल्या या बेकायदा बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये होती. बंगला पाडण्याचे काम 25 जानेवारीला सुरु झाले होते. परंतु बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्याने तो डायनामाइटने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

प्रशासकीय सूत्रांनुसार, नीरव मोदीचा बंगला पूर्णपणे बेकायदा होता. समुद्र किनार्‍याच्या मानदंड धाब्यावर ठेऊन तो बांधण्यात आला होता. नीरवला 2011 मध्ये 376 वर्ग मीटर जागेत बंगला बांधण्याची परवानगी मिळाली होती. परंतु, नीरवने नियमांचे उल्लंघन करून 1081 वर्ग मीटर जागेत बंगला बांधला होता. अनेक बेडरूम्स आरि हॉल असलेल्या आलिशान बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर 1000 वर्ग फूटाचा स्वीमिंग पूल होता. नीरवने बंगल्याच्या परिसरात बेकायदा गार्डनही बनविले होते.

 

रिमोटच्या मदतीने करण्यात आला बंगल्यात स्फोट..

बंगल्याच्या पिलर्समध्ये छिद्र पाडण्यासाठी गुरुवारी डायनामाइट बसविण्याचे काम पूर्ण झाले. नंतर ते रिमोटच्या मदतीने स्फोट घडविण्यात आला. एक बटण दाबताच बंगला जमिनदोस्त झाला.

 

अंमलबजावणी संचालनालयाने बंगला पाडण्याविरोधात दाखल केली होती याचिका..
नीरव मोदीचा बंगला पाडण्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. नीरवचा हा बंगला पीएनबी घोटाळ्या प्रकरणात जप्त करण्‍यात आला होता.

 

हायकोर्टाच्या आदेशानुसार झाली कारवाई..

राज्य सरकारने एक फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सांग‍ितले की, अलीबाग येथील नीरवचा बेकायदा बंगला पाडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे.

 

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी..
नीरव मोदी आणि मेहुल चौकसीवर 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणी सीबीआय आणि ईडी तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...