आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार नीरव मोदी ब्रिटनमध्येच; सीबीअायकडून प्रत्यार्पण अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून पलायन केलेला हिरा व्यापारी नीरव मोदी ब्रिटनमध्ये लपला आहे. नीरव लंडनमध्येच असल्याचे ब्रिटनने सीबीआयकडे मान्य केले. 


दुसरीकडे, सीबीआयने नीरवच्या प्रत्यार्पणासाठी गृह मंत्रालयाकडे अर्ज सादर केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ब्रिटन सरकारकडे हा अर्ज पाठवण्यात येईल.  नीरवविरुद्ध इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटिसीच्या आधारावर सीबीआयने त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यासाठी आग्रह धरला असल्याची माहिती आहे. 


जून महिन्यातच नीरवविरुद्ध नोटीस काढण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये नीरव सध्या लंडनमधील मेफेअर परिसरातील त्याच्या दागिन्यांच्या स्टोअरच्या वरील फ्लॅटमध्ये राहत आहे.  

बातम्या आणखी आहेत...