Home | National | Delhi | nirav modi sold one diamond to 4 shell companies the root of PNB fraud claims us report

PNB Fraud: नीरव मोदीने एकच हिरा जगभर फिरवला, 21.38 कोटी डॉलरचे बनावट बिल दाखवून काढले कर्ज; अमेरिकन अहवालातील दावा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 04:26 PM IST

अमेरिकेतील सिक्यॉरिटी अॅन्ड एक्सचेंज कमिशन आणि न्याय विभागाच्या वकीलांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

 • nirav modi sold one diamond to 4 shell companies the root of PNB fraud claims us report

  वॉशिंग्टन / नवी दिल्ली - नीरव मोदीने अवघ्या 3 कॅरेटचा एकच हिरा संशयित कंपन्यांना 4 वेळा पाठवून जगभर फिरवला. 2011 मध्ये फक्त 5 आठवड्यात त्याने हे कृत्य केले. राउंड ट्रिपिंगचा हा खेळ सर्वात मोठा बँकिंग घोटाळा पीएनबी फ्रॉडचे मूळ आहे. अमेरिकेतील सिक्यॉरिटी अॅन्ड एक्सचेंज कमिशन आणि न्याय विभागाच्या वकीलांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गने या अहवालाचा दाखला देत सांगितल्याप्रमाणे, नीरवने 2011 पासून 2017 पर्यंत एकूणच 21.38 कोटींची बनावट बिल तयार केले. याच बिलांच्या आधारे त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज काढण्यास सुरुवात केली.

  सर्व खोट्या कंपन्या नीरव मोदीच्या...
  विक्रीत तेजीचा बनाव करून नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक देशांमध्ये 4 अब्ज डॉलरचे कर्ज काढले. यासाठी त्यांनी 20 बनावट कंपन्या दाखवल्या होत्या. ऑगस्ट 2011 मध्ये पिवळ्या आणि हलक्या केशरी रंगाचा हिरा सर्वात आधी त्याने अमेरिकन कंपनी फायरस्टार डायमंडला विकला. यानंतर हाच हिरा हाँगकाँग येथील फॅन्सी क्रिएशन नावाच्या बनावट कंपनीला पाठवण्याचा बनाव केला. यात त्या हिऱ्याची किंमत 11 लाख डॉलर दाखवण्यात आली. या दोन्ही कंपन्या बनावट आणि त्या नीरव मोदीच्याच होत्या. या व्यवहारांच्या दोनच आठवड्यानंतर त्याने हाच हिरा सोलार एक्सपोर्ट कंपनीकडे पाठवला. सोलार एक्सपोर्ट सुद्धा नीरव मोदीचे कौटुंबिक पार्टनरशिपचे असून फायरस्टार डायमंड त्याची पॅरेंट कंपनी होती.

  संयुक्त अरब अमिरातमध्ये नीरवची शेल कंपनी
  अहवालानुसार, एका आठवड्यानंतर न्यूयॉर्क येथील फायरस्टारने पुन्हा हाँगकाँगच्या फॅन्सी क्रिएशनला हिरा पाठवला. या दरम्यान हिऱ्याची किंमत 11.6 लाख डॉलर दाखवण्यात आली. दोन आठवड्यानंतर न्यूयॉर्क येथील ए. जेफ डायमंड कंपनीने वर्ल्ड डायमंड डिस्ट्रीब्युशनला हा हिरा विकला. तोपर्यंत त्याच हिऱ्याची किंमत 12 लाख डॉलर करण्यात आली होती. वर्ल्ड डायमंड सुद्धा यूएईमध्ये कथित मुख्यालय असलेली नीरव मोदीची बनावट कंपनी होती. हीच सायकल पुढे अशीच सुरू होती.

Trending