आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीने जामीन मिळण्यासाठी केला अजब युक्तिवाद, कुत्र्याचा सांभाळ करण्याचे दिले कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - वेस्टमिन्स्टर कोर्टाने पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा जामीन नामंजूर केला आहे. पण नीरवने तुरुंगातून सुटण्यासाठी कोणताही प्रयत्न सोडला नाही. नीरवने चक्क पाळीव कुत्र्याचा सांभाळ करण्यासाठी जामीन देण्याची अपील केली. पण कोर्टाने त्याचा जामीन नामंजूर केला. नीरवला 26 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याचा खटल्यावर सुनावणी होणार आहे. 


नीरवचा वकिल म्हणाला -  ब्रिटनचे लोकांचे प्राण्यांवर खूप प्रेम असते 

> नीरवचे ब्रिटनसोबत कोणताही सामाजिक करार नाहीये आणि त्याचा देश सोडून पळून जाण्याचा धोका असल्यामुळे चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा एबर्थनॉटने शुक्रवारी नीरवचा जामीन नामंजूर केला.

> नीरवचे वकील क्लेअर मॉन्टगोमेरीने नीरवला जामीन मिळावा यासाठी अनेक तर्क लावले. तो म्हणाला की, नीरवचा मुलाने शालेय शिक्षण पूर्ण केले असून पुढील शिक्षणासाठी तो आता विद्यापीठात गेला आहे. यामुळे नीरवला आई-वडिलांसाठी कुत्रा पाळवा लागला. यामुळे तो देश सोडून पळून जाईल असे वाटत नाही. तसचे ब्रिटनच्या लोकांची ओळख आहे की ते प्राण्यांवर खूप प्रेम असते. 


नीरव देश सोडून पळून जाण्याचा धोका - सीपीएस वकील
> क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिस (सीपीएस) चे वकील भारताकडून बोलतांना म्हणाले की, 'नीरव देश सोडून पळून जाण्याचा धोका आहे. तसेच तो पुरावे नष्ट करण्याचा धोका आहे. सोबतच साक्षीदारांना प्रभावित करू शकतो.' पुढे बोलताना ते म्हणाले की, नीरवने एका साक्षीदाराला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर दुसऱ्या साक्षीदाराला लाच देण्याचे आमिष दाखवले होते. ।

बातम्या आणखी आहेत...