आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Accused Baseless Demand On About His Death Penalty, Nirbhaya News And Updates

निर्भयाच्या दोषीचे तर्क-वितर्क; मृत्यू समोर दिसताच महात्मा गांधी, वेद-पुराण, मानवाधिकार असे सर्व आठवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फाशीपासून वाचण्यासाठी अक्षयने अशा रीतीने तर्क-वितर्क दिले आहेत...

नवी दिल्ली- फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या निर्भया हत्याकांडातील दोषी अक्षय कुमारने मंगळवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. फेरविचार याचिका दाखल केली. फाशीपासून वाचण्यासाठी कायदेशीर बाबींसह व्यवस्थेची चेष्टा करत सहा तर्क-वितर्कही दिले आहेत. अक्षयच्या वतीने वकील ए. पी. सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे.

1. वयोमान घटते आहे, सध्या मनुष्याची स्थिती मृतदेहापेक्षा वाईट :


युष्य कमी राहिले आहे तेव्हा फाशीची शिक्षा का देता? वेद, उपनिषद आणि पुराण सांगतात की सत्ययुग आणि त्रेतायुगात लोक हजारो वर्षे जगत. कलियुगात वयोमान घटून ५०-६० वर्षेच राहिले आहे. सध्या मनुष्याची स्थिती मृतदेहापेक्षाही वाईट आहे.

2. लोक असेच मरताहेत, तेव्हा फाशीची शिक्षा का ?
 
दिल्लीत हवा अत्यंत वाईट आहे. हे गॅस चेंबर झाले आहे. येथील पाणी विषारी झाले आहे. येथे आयुष्य कमी कमी होत आहे. लोक असेच मरताहेत, तेव्हा फाशी का ?

3. महात्मा गांधींच्या वाक्यांचे स्मरण :


राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, तुम्ही जे करता आहात, ते त्या व्यक्तीच्या हिताचे आहे की नाही ? त्यामुळे काही मिळणार आहे का ? आपले भाग्य निश्चित करू शकेल का ? तेव्हा तुमच्या सर्व शंकांचे उत्तर मिळेल.
दिल्लीत प्रदूषित हवा-पाण्यामुळे लोक असेच मरताहेत, मग मला फाशीची शिक्षा का देत आहात?

फाशीची शिक्षा झालेल्या अक्षयची फेरविचार याचिका

4. गुन्ह्याचा द्वेष करा, गुन्हेगारांचा नव्हे :


फाशीची शिक्षा हे न्यायाच्या नावे व्यक्तीची हत्या करण्याचे षड‌्यंत्र आहे. समस्येच्या मुळाशी जा. योजनाबद्ध पुनर्वसनाबाबत विचार करा. शिक्षा गुन्हेगाराला मारते, गुन्ह्याला नाही. शिक्षेचा प्रकार, पद्धतीबाबत विचार व्हावा.

5. फाशीची शिक्षा मानवाधिकारांचे उल्लंघन :


फाशीची शिक्षा हे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. अहिंसा या तत्त्वाच्या विरोधातही आहे. फाशी हिंसेची संस्कृती दर्शवते. हे उत्तर नव्हे. कोणी जिवंत राहावे आणि कोणी नको ? हे ठरवण्याची परवानगी न्यायव्यवस्थेला देणे योग्य नव्हे.

6. अनेक देशांनी फाशीची शिक्षा बंद केली, भारतानेही करावी :
फाशीची शिक्षा बंद केली पाहिजे. इंग्लंडने १९५६ मध्ये फाशी बंद केली. अर्जेंटिना, ब्राझील, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको, पनामा आणि पेरू या देशानेही बंद केली आहे. भारतानेही बंद करावी.
मुकेश सिंह

११ फास तिहारमध्ये पोहोचले, दोषींच्या वजनाइतकी वाळू लटकवून सराव
 
तिहार तुरुंगातील फाशीगृहात मंगळवारी रंगरंगोटी झाली. दोषींच्या वजनाइतके वाळूचे पोते लटकवून फाशीचा सराव करण्यात आला. ११ फास तुरुंगात पोहोचले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, उत्तर प्रदेश सरकारकडून जल्लाद मागवण्यात आला आहे. चारही दोषींची माहिती तुरुंग मुख्यालयास पाठवण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी विनय शर्माची दया याचिका फेटाळताच तुरुंग प्रशासन फाशीच्या तारखेसाठी अर्ज करेल.

आपल्या बँक खात्यातील पैसे पत्नीच्या खात्यावर वळते करावेत, असा अर्ज अक्षयने तुरुंग प्रशासनाकडे केला आहे.

पुढे काय? : दयेचा अर्ज फेटाळला तरी दोषींकडे १४ दिवस...


'विनयचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला तरी दोषींना १४ दिवस मिळतील. २०१४ च्या नियमानुसार बँक खाती किंवा मालमत्ता ट्रान्सफर अशा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी दोषींना १४ दिवस दिले जातात. यात दयेचा अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते. दुसरीकडे, अक्षयची फेरविचार याचिका प्रलंबित राहिली तरी इतरांना फासावर लटकवले जाईल. - विराग गुप्ता, घटनातज्ञ
 

बातम्या आणखी आहेत...