आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Case : A Step Towards The Execution; Home Ministry Recommends Denying Mercy Petition

फाशीच्या दिशेने एक पाऊल; विनयची दया याचिका फेटाळण्याची शिफारस गृह मंत्रालयाकडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर झालेला सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक असलेला विनय शर्मा याची दया याचिका फेटाळण्याबाबतची दिल्ली सरकारची शिफारस गृह मंत्रालयाला मिळाली आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दया याचिका फेटाळून लावण्याची शिफारस पाठवली आहे. आता गृह मंत्रालय आपल्या टिप्पणीसह अंतिम निर्णयासाठी ही फाइल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवेल. निर्भयावर झालेला सामूहिक अत्याचार आणि हत्येतील गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेचा सामना करत असलेल्या चार दोषींपैकी तिघांनी दया याचिका दाखल केली नाही. हैदराबादमध्ये व्हेटरनरी डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करून तिला जाळून टाकल्यामुळे देशभरात रोष आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने विनयची दया याचिका फेटाळण्याची शिफारस केली आहे.गृह मंत्रालय आपल्या टिप्पणीसह फाइल राष्ट्रपतींकडे पाठवेल. सामान्यत: राष्ट्रपती सरकारच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब करतात. अर्थात, ते योग्य कारण सांगून वेगळा निर्णयही देऊ शकतात. राष्ट्रपतींच्या निर्णयानंतर गृह मंत्रालय संबंधित फाइल राज्याच्या गृह विभागाकडे पाठवेल. तेथून ही फाइल तुरुंगात पाठवली जाईल. ज्या न्यायालयाने दोषीला प्रथम फाशीची शिक्षा सुनावली होती त्या न्यायालयाला तुरुंग प्रशासन याची माहिती देईल. दया याचिका रद्द होणे आणि फाशी देणे यात किमान १५ दिवसांचे अंतर असावे, असे निर्देश अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयान दिले होते.

बातम्या आणखी आहेत...