आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारही आरोपींचे फाशीपासून वाचण्याचे कायदेशीर पर्याय संपले, कोर्ट आज जारी करू शकते अंतिम डेथ वॉरंट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : कायदेशीर युक्त्या लढवून दोन महिन्यांपासून फाशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असलेल्या निर्भया केसच्या चारही दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळली, त्यानंतर दिल्ली सरकार नवे डेथ वॉरंट जारी करण्यासाठी पतियाळा हाऊस पोहोचले आहेत. एडिशनल सेशन जज धर्मेंद्र राणा यांनी चारही दोषींना नोटिस जारी करून गुरुवारपर्यंत उत्तर मागितले आहे. कोर्ट शक्यतो आज अंतिम डेथ वॉरंट जारी करू शकते. निर्भयाच्या वडिलांनी आशा व्यक्त केली आहे की, आरोपींची फाशी यावेळी टळणार नाही. 

राष्ट्रपतींनी दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळली. त्याच्याकडे फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी हा शेवटचा कायदेशीर पर्याय होता. सुप्रीम कोर्टात सोमवारी पवनची क्यूरेटिव्ह पिटीशन फेटाळली गेल्याच्या नंतर लगेच त्याने राष्ट्रपतींना दया याचिका पाठवली होती. याच आधारावर ट्रायल कोर्टाने आरोपींची फाशी तिसऱ्यांदा टाळली होती.

पवनने जन्मठेपेची विनंती केली होती... 

दोषी पवनने सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करून फाशी जन्मठेपेत बदलण्याची मागणी केली होती. ती फेटाळत जस्टिस एनवी रमना यांचे अध्यक्षत्व असलेल्या 5 जजच्या बेंचने सांगितले होते की, शिक्षेवर पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापूर्वी राष्ट्रपतींनी निर्भया प्रकारांतील इतर तीन आरोपी अक्षय, विनय आणि मुकेश यांच्याही दया याचिका फेटाळल्या आहेत. 

तीनवेळा रद्द झाले आहे डेथ वॉरंट...  

  • पहिल्यांदा - 22 जानेवारीला सकाळी 6 वाजता फाशी होणार होती, पण टाळली गेली.
  • दुसऱ्यांदा - 1 फेब्रुवारीला फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले गेले, पण फाशी झाली नाही.
  • तिसऱ्यांदा - 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार होती, पण आरोपी पवनकडे कायदेशीर पर्याय बाकी असल्यामुळे फाशी टाळली गेली.

16 डिसेंबर 2012 : 6 आरोपींनी निर्भयासोबत केले होते दुष्कृत्य...

दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थिनीसोबत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 6 लोकांनी चालत्या बसमध्ये दुष्कृत्य केले होते. गंभीर जखमांमुळे 26 डिसेंबरला सिंगापुरमध्ये उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या 9 महिन्यानंतर म्हणजेच 2013 मध्ये लोअर कोर्टाने 5 आरोपी... राम सिंह, पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये हायकोर्ट आणि मे 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. ट्रायलदरम्यान मुख्य दोषी राम सिंहने तिहार जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणखी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे 3 वर्षात सुधारणा गृहात राहून मुक्त झाला आहे.