आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Case Culprits Are Going To Shifted In Near Hanging House, CCTV Cameras Installed In Jail Number 3

दोषींना फाशीघराजवळ हलवणार, जेल नंबर - 3 मध्ये लावले सीसीटीव्ही कॅमेरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : निर्भया हत्याकांडातील चार दोषींना फाशी देण्यासाठी न्यायालयाने २२ तारीख निश्चित केल्यानंतर या चौघांना आता फाशीघरापासून अवघ्या १५ फुटावर असलेल्या बराकीत हलवले जाणार आहे. या बराकीभोवती कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतील. या प्रकरणातील तीन दोषी मुकेश, पवन गुप्ता आणि अक्षय सिंह जेल नंबर २ मध्ये बंदिस्त असून चौथा विनय शर्मा याला जेल नंबर ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. फाशीघर जेल नंबर ३ मध्ये आहे. या चौघांनाही तेथे हलवण्यासाठी बराकीत सुधारणा करण्यात येत आहे. फाशीघराला लागूनच ही बराक असल्याने या चौघांना तिथे हलवण्यात येत आहे. या बराकीत सुरक्षेच्या दृष्टीने अंथरूण आणि पांघरुणाशिवाय काहीही ठेवले जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...