आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दोषींच्या क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्या, पाच सदस्यीय पीठाचा काही मिनिटांतच निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेशची हायकोर्टात धाव, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही
  • फाशी काही दिवस टाळण्यासाठी दोषींची नवी चाल...

नवी दिल्ली - निर्भया हत्याकांडातील दोन दोषी विनय शर्मा व मुकेश कुमार यांच्या क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी काही मिनिटांतच फेटाळल्या.  दुपारी १.४५ वाजता सुनावणी सुरू झाली आणि २.०० वा. निकाल देण्यात आला. ७ जानेवारीला कोर्टाने डेथ वॉरंट काढून 
चार दोषींना फाशीसाठी २२ जानेवारी रोजी सकाळी ७ ची वेळ दिली आहे.

आता एकच पर्याय 


सुप्रीम कोर्टातील वकील फौजिया शकील यांनी सांगितले, बचावासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज हा एकमेव पर्याय आता आहे. असा अर्ज प्रलंबित असेल तर फाशी देता येत नाही. दरम्यान, मुकेशकुमारने आता राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. 

२० रोजी जल्लाद येणार 


पवन जल्लाद मेरठहून २० जानेवारीला तिहारमध्ये पोहोचेल. प्रत्येक फाशीसाठी त्याला १५ हजार रु. मिळतील. २१ रोजी याची चाचणी होईल. दरम्यान, चौघांच्या कुटुंबांना २० रोजी अखेरचे भेटू दिले जाईल. नंतर कुणालाही भेटता येणार नाही. फाशी काही दिवस टाळण्यासाठी दोषींची नवी चाल...

या प्रकरणातील अन्य दोन दोषी अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता यांची अजून क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही. २१ जानेवारीला ते ही याचिका दाखल करून फाशीवर स्थगिती देण्याची मागणी करू शकतात. सुप्रीम कोर्टाने अक्षय ठाकूरची फेरविचार याचिका १८ डिसेंबरला फेटाळली होती, तर उर्वरित तिघांच्या याचिका पूर्वीच फेटाळल्या गेल्या आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...