आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Case | Nirbhaya Case Convict Pawan Kumar Curative Petition Latest News And Updates

फाशी टाळण्यासाठी दोषी पवनच्या याचिकेवर ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला; सुप्रीम कोर्टाने त्याची क्यूरेटिव्ह पिटीशन रद्द केली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीचे वकील ए.पी. सिंग यांनी दया याचिका पाठवण्याची मागणी करत फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती
  • निर्भयाची आई म्हणाली - जग पाहत आहे की, नराधमांचे वकिल कोर्टाची दिशाभूल करत फाशीत अडथळा निर्माण करताहेत

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी टाळण्याच्या याचिकेवर पतियाळा कोर्टाने निर्णय राखीव ठेवला. राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. ती प्रलंबित असेपर्यंत फाशी टाळावी असा युक्तीवाद पवनने केला होता. यापूर्वी ट्रायल कोर्टाने दोषी अक्षय सिंह आणि पवन गुप्ता दोघांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. कोर्टाने आदेश जारी करताच त्यांच्या पक्षकाराने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. यामुळे त्याची फाशी टाळण्यात यावी, असे पवनचे वकील एपी सिंह म्हणाले. यावर अतिरिक्त सेशन जज न्यायमूर्ती धर्मेंद्र राणाने सिंह यांना जेवणानंतर आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. दोषींचे वकील सिंह म्हणाले की, सुप्रीम कोर्टात पवनची क्युरिटिव्ह पिटीशन रद्द होताच दया याचिका दाखल केली होती. निर्भयाच्या चार आरोपींपैकी केवळ पवनकचे दया याचिकेचा एकमेव कायदेशीर पर्याय बाकी होता. इतर तीन विनय शर्मा, मुकेश सिंह आणि अक्षय ठाकुर हे आरोपींनी यापूर्वीच सर्व पर्याय वापरले आहेत. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने पवनची अल्पवयीन असल्याची याचिका आणि यावर वरील रिव्ह्यू पिटीशन फेटाळली होती. मात्र दोषी अक्षयने याचिके पतियाळा कोर्टाला म्हटले होते की, त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे आणि यावर आतापर्यंत निर्णय झाला नाही. त्याच्या वकिलानुसार, मागील दया याचिकेत पूर्ण तथ्य नव्हते. यामुळे ती रद्द करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने पवनची क्युरेटिव्ह पिटीशन रद्द केली 


पवनची क्युरेटिव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली आहे. पवनने फाशीला जन्मठेपेत बदलण्याची विनंती केली होती. पवनचे वकील एपी सिंह यांनी रविवारी म्हटले होते, की हे प्रकरण मृत्यूदंडाशी संबंधित आहे. त्यामुळे याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी घेण्यात यावी. पतियाळा हाउस कोर्टाने तिसरे डेथ वॉरंट जारी करताना फाशीसाठी 3 मार्च ही तारीख ठरवली आहे. मात्र या चार दोषींना मंगळवारी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तत्पूर्वी शनिवारी आणखी एक दोषी अक्षय सिंहने पतियाळा हाउस कोर्टात अपील केले होते, की 3 मार्चला होणारी फाशी थांबवण्यात यावी. त्यावर कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला नोटीस जारी करताना 2 मार्च पर्यंत उत्तर मागितले होते. अक्षयने याचिकेत म्हटले होते की त्याने राष्ट्रपतींकडे नव्याने दया याचिका पाठवली आहे आणि त्यावर अजुनही निर्णय झालेला नाही. ही याचिकाही आता पतियाळा कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली आहे.कोर्टाच्या कारभाराने धक्का बसला


निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सुनावणी होण्यापूर्वी म्हटले होते, की "कोर्टाच्या निष्क्रीय कारभारामुळे मला धक्का बसला आहे. सारे जग बघतेय की नराधमांच्या वकिलांनी कसे कोर्टाची दिशाभूल करून फाशीची अंमलबजावणी होण्यात टाळा-टाळ केली. आता या नराधमांनी फाशीला दोन दिवस शिल्लक असताना पुन्हा याचिका मांडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाला एवढा वेळ का लागतोय. निर्णय झालाच आहे, तर मग अंमलबजावणीसाठी वेळ का लागत आहे."