आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Case : Sketches Made By One Of The Accused, Shayari Too; One Sketches Devils In Tihar Jail

मारेकऱ्यापैकी एकाने काढली चित्रे, शायरीही; तिहार तुरुंगात दोषीने रेखाटला 'दरिंदा'!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेची उलट गणती करणाऱ्या निर्भयाच्या चार मारेकऱ्यांपैकी विनयकुमार या दोषीने तिहार तुरुंगात चित्रे रेखाटली आहेत. शायरीही लिहून तो दिवस ढकलू लागला आहे. १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री झालेल्या अत्याचार व क्रौर्याची कहाणी त्याने तुरुंगात रेखाटली. त्यात असहाय मुलीचा काही मुले छेड काढताना, छळ करताना दाखवले. या चित्राच्या खालोखाल फाशीचे चार दोरखंड दिसून येतात. त्यावरून अत्याचार करणाऱ्यांचा शेवट फाशीने झाल्याचे त्यास सुचवायचे असावे.

विनयने दरिंदा नावाने एक पेंटिंग बनवले आहे. विनयच्या मागणीनुसार तुुरुंग प्रशासनाने त्याला कागद, पेन्सिल व ब्रश दिले होते. त्याच्या मदतीने त्याने १९ पेक्षा जास्त पेंटिंग तयार केल्या. दैनिक भास्करकडे त्याच्या पेंटिंगची छायाचित्रे आहेत.

त्याने आपली आई व स्वर्गीय आजोबांचेही चित्र काढले. आपल्या आईसाठी तयार केलेल्या चित्रासोबत त्याने तुझी खूप आठवण येते, असे शब्द रेखाटले. विनय रात्रभर आपल्या आईची आठवण काढून रडू लागतो, असे तुरुंग सूत्रांनी सांगितले.

पत्राद्वारे मित्रांना सल्ला

विनयने आपल्या चार मित्रांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्याने मित्रांना चांगले वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राजू, कमल, रोहित सिंह व दिनेश अशी मित्रांची नावे आहेत. मी सर्व मित्रांवर प्रेम करतो. त्यांची आठवण येते. तुम्हाला सहन होऊ शकणार नाही, असे तुम्ही इतरांना बोलू नका, असे सांगून विनय शर्माने काही शेरही लिहिले.

'दरिंदा' चा फोटो वकिलास दिला, तीन याचिकांचा निपटारा

दिल्लीच्या पतियाळा हाऊस सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार तिहार तुरुंग प्रशासनाने निर्भयाचा मारेकरी विनयकुमारने तुरुंगात लिहिलेल्या डायरी 'दरिंदा'चा फोटो व इतर दस्तऐवज त्याचे वकील ए.पी. सिंह यांना दिले आहेत. याबरोबरच कोर्टाने निर्भयाच्या तीन गुन्हेगार-अक्षय ठाकूर, पवन, विनय यांच्या याचिकांचा शनिवारी निपटारा केला आहे.

सत्र न्यायाधीश अजयकुमार जैन म्हणाले, दोषींचे वकील तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित दस्तऐवज, पेंटिंग आणि डायरीची फोटोकॉपी व फोटो घेता येऊ शकेल. जज जैन म्हणाले, दोषींच्या प्रकरणात आता कोणताही निर्देश देण्याची गरज नाही. याआधी कोर्टात तिहार तुरुंगाचे वकील इरफान अहमद यांनी सर्व दस्तऐवज सादर केल्याचे सांगितले होते. गुन्हेगार फाशीची तारीख टाळण्यासाठी याचिका दाखल करत होते.

दरम्यान निर्भया प्रकरणात दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील मोर्चा काढण्यात आला होता. निर्भयाच्या आईने देखील आग्रह केला होता.

दया याचिकेस आव्हान

राष्ट्रपतींकडे १०० हून अधिक याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळेच माझ्या याचिकेवर घाईत निर्णय झाला आहे. अन्य दोषी मुकेशकुमार सिंहने फाशी टाळण्यासाठी आणखी एक कायदेशीर खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात राष्ट्रपतींचा निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे.