आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Case : The President Rejects The Plea Of Guilty Pawan, Now No Accused Has Any Option

राष्ट्रपतींनी दोषी पवनची दया याचिका फेटाळली, आता कोणत्याही आरोपीकडे पर्याय उरलेला नाही

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

​​​​​नवी दिल्ली : राष्ट्रपतींनी दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळली. त्याच्याकडे फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी हा शेवटचा कायदेशीर पर्याय होता. सुप्रीम कोर्टात सोमवारी पवनची क्यूरेटिव्ह पिटीशन फेटाळली गेल्याच्या नंतर लगेच त्याने राष्ट्रपतींना दया याचिका पाठवली होती. याच आधारावर ट्रायल कोर्टाने आरोपींची फाशी तिसऱ्यांदा टाळली होती. 

दोषी पवनने सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करून फाशी जन्मठेपेत बदलण्याची मागणी केली होती. ती फेटाळत जस्टिस एनवी रमना यांचे अध्यक्षत्व असलेल्या 5 जजच्या बेंचने म्हणाले होते की, शिक्षेवर पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 


निर्भयाच्या आई म्हणाल्या होत्या - सिस्टीम आरोपींची मदतनीस.
.. 

तिसऱ्यांदा फाशी रोखल्यानंतर निर्भयाच्या आई ने सिस्टमबद्दल निराशा व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या - शिक्षा सतत रोखाने सिस्टीमची निष्क्रियता दर्शवते. आपली संपूर्ण सिस्टमचा दोषींची मदतनीस आहे. 

कोर्टाने पवनच्या वकिलांना सांगितले होते - तुम्ही आगीशी खेळत आहात... 

सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पिटीशन फेलाटातल्या गेल्यानंतर पवनने दया याचिका दाखल केली होती. यानंतर दोषींच्या वकिलांनी ट्रायल कोर्टात दया याचिका प्रलंबित असल्याच्या आधारावर फाशी रोखण्याची अपील केली होती. कोर्टाने क्यूरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करण्यास उशीर केल्याबद्दल पवनचे वकील एपी सिंह यांना फटकारले होते. जज म्हणाले होते - कोणत्याही पद्धतीने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले तर परिणाम तुमच्यासमोर असताही. कोर्टाने सिंह यांना सांगितले होते - तुम्ही आगीशी खेळत आहात, सावध व्हा.. 

16 डिसेंबर 2012 : 6 आरोपींनी निर्भयासोबत केले होते दुष्कृत्य... 

दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थिनीसोबत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 6 लोकांनी चालत्या बसमध्ये दुष्कृत्य केले होते. गंभीर जखमांमुळे 26 डिसेंबरला सिंगापुरमध्ये उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या 9 महिन्यानंतर म्हणजेच 2013 मध्ये लोअर कोर्टाने 5 आरोपी... राम सिंह, पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये हायकोर्ट आणि मे 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. ट्रायलदरम्यान मुख्य दोषी राम सिंहने तिहार जेलमध्ये फाशी लावून घेऊन आत्महत्या केली होती. आणखी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे 3 वर्षात सुधारणा गृहात राहून मुक्त झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...