आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nirbhaya Case : 'we Can Not Hanged As Far As Legal Options'; Opinion Of Delhi Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कायदेशीर पर्याय असेपर्यंत फाशी देणे पाप’; दिल्लीच्या कोर्टाचे मत

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • निर्भयाच्या दोषींवर नवे डेथ वॉरंट जारी करण्यास नकार
  • दोषींना वेगवेगळ्या फाशीवर ११ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली - दिल्लीतील न्यायालयाने निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या. दिल्ली सरकार व तिहार तुरुंग प्रशासनाच्या याचिकांवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी सुनावणी केली. त्यांनी दिल्ली हायकोर्टाच्या ५ फेब्रुवारीच्या आदेशाचा उल्लेख केला. त्यात हायकोर्टाने दाेषींना आपल्या बचावाचे सर्व पर्याय आठवडाभरात वापरून पूर्ण करण्याचा आदेश दिला होता.
न्या. राणा म्हणाले, गुन्हेगारांना जोवर कायदा जगण्याचा अधिकार देतो तोवर त्यांना फाशी देणे पाप आहे. सरकारी पक्ष योग्य वेळी पुन्हा अर्ज करू शकतो. निर्भयाच्या गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फाशीची शिक्षा देण्यावर सत्र न्यायालयाने ३१ जानेवारीला अनिश्चित मुदतीसाठी स्थगिती दिली होती. दोषींना वेगवेगळ्या फाशीवर ११ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी
 
निर्भयाच्या गुन्हेगारांना वेगवेगळी फाशी देण्याच्या केंद्राच्या याचिकेवर सुप्रीम काेर्ट ११ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. याचिकेत दिल्ली हायकोर्टाच्या निकालास आव्हान देण्यात आले आहे. गुन्हेगारांना नाेटीस जारी केली तर प्रकरणास आणखी विलंब होईल, असे म्हणत कोर्टाने नोटिसीची मागणी फेटाळली. युक्तिवादात सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी फाशीच्या शिक्षेतील विलंब टाळण्यासाठी नवीन नियम करावा लागेल, असे म्हटले होते.