आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nirbhaya : Different Executions To The Assaults ; Union's Petition Against High Court Hearing, In Supreme Court Today News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेषींना वेगवेगळी फाशी; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध केंद्राची याचिका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निर्भया हत्याकांडप्रकरणी दोषींना वेगवेगळी फाशी देण्यासंबंधी केंद्राच्या मागणीवर सर्वाेच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास संमती दर्शवली. केंद्राच्या वतीने गुरुवारी अतिरिक्त महाधिवक्ता के. एम. नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. ती मान्य करण्यात आली. यावर शुक्रवारी  न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठासमोर  सुनावणी होणार आहे.

नव्या डेथ वॉरंटसाठी तुरुंग प्रशासन पुन्हा कोर्टात

तिहार तुरुंग प्रशासनाने  गुरुवारी पुन्हा एकदा चारही दोषींवर डेथ वॉरंट जारी करण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टात धाव घेतली. तुरुंग प्रशासनाच्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी चारही दोषींकडून उत्तर मागवले आहे. यावरही शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याआधीही ट्रायल कोर्टाने  ३१ जानेवारी रोजी पुढील आदेश येईपर्यंत फाशी देण्यास स्थगिती दिली होती.