आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Rape And Murder Case | Third Death Warrant Of Accused Also Canceled Latest News And Updates

फाशी लटकली, नराधम कधी लटकणार? तिसरे डेथ वाॅरंटही रद्द, पुढील तारीख निश्चित नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्ट म्हणाले, निर्भयाचे दोषी जेव्हा देवाला भेटतील तेव्हा कोर्टाने संधीच दिली नाही, अशी त्यांची तक्रार नको
  • नराधम जिवंत, डेथ वाॅरंट फासावर
  • निर्भयाची आई म्हणाली, संपूर्ण यंत्रणा दोषींना मदत करतेय

नवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली. फाशीला २४ तासांपेक्षा कमी वेळ उरला असताना दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. यानंतर पतियाळा हाउस कोर्टाचे अति. सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पुढील आदेश येईपर्यंत चौघांच्या फाशीला स्थगिती दिली. न्या. राणा म्हणाले, ‘तीव्र विरोधानंतरही मला वाटते की, दोषी जेव्हा देवाला भेटतील तेव्हा देशातील कोर्टांनी  कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याची संधी देण्यात नि:पक्षपणा राखला नाही, अशी त्यांची तक्रार नको. एका दोषीचा दयेचा अर्ज प्रलंबित राहीपर्यंत फाशी देता येत नाही.’ मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा व अक्षय ठाकूरला मंगळवारी पहाटे ६ वाजता फाशी दिली जाणार होती. तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने पवनची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली. पतियाळा हाउस कोर्टाने डेथ वाॅरंटवर स्थगितीस नकार देत पवन व अक्षयच्या  याचिका फेटाळल्या. यानंतर दयेचा अर्ज सादर केल्याने फाशी लांबणीवर पडली. शेवटचा डाव : दयेचा अर्ज रद्द झाल्यानंतरही दोषी किमान १४ दिवस वाचतील


दोषींनी सर्व कायदेशीर पर्याय अवलंबले आहेत. मुकेश, अक्षय, िवनय, पवनच्या क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्या आहेत. मुकेश, अक्षय व विनयचे दयेचे अर्जही फेटाळले. काही वृत्तांत राष्ट्रपतींनी पवन याचा दयेचा अर्जही फेटाळल्याचे म्हटले होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. निर्भयाच्या वकील म्हणाल्या २-३ दिवसांत आणखी एक डेथ वाॅरंट जारी होईल, ते शेवटचे डेथ वॉरंट असेल. पुढे काय? आता चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी घेऊन तुरुंग प्रशासनास कोर्टात जावे लागेल
 
आता शेवटचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे गेला आहे. तो फेटाळल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासन कोर्टाला सूचित करून नवीन डेथ वाॅरंट जारी करण्याची मागणी करेल. नियमानुसार, दयेचा अर्ज फेटाळला गेल्याच्या १४ दिवसांनंतरच फाशी दिली जाऊ शकते. म्हणजेच राष्ट्रपतींनी आजच दयेचा अर्ज फेटाळला अन् कोर्टानेही एका दिवसात डेथ वाॅरंट जारी केले तरीही दोषी किमान १७ मार्चपर्यंत फासावर लटकणार नाहीत. यंत्रणेची अवस्था : गतवर्षी विविध प्रकरणांत ६ डेथ वाॅरंट जारी करण्यात आले, सर्वांना स्थगिती
 
दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, २०१९ मध्ये एकूण ६ डेथ वाॅरंट जारी झाले. मात्र एकाचीही अंमलबजावणी झाली नाही. कधी सुप्रीम कोर्ट तर कधी कनिष्ठ न्यायालयांनी स्थगिती दिली. महत्त्वाचे म्हणजे, बहुतांश वाॅरंट हे सध्याच्या निर्भया प्रकरणासारखेच रोखण्यात आले. म्हणजेच, फाशीच्या आधी कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याचे डावपेच.पहिले वाॅरंट ७ जानेवारी... फाशीची तारीख : २२ जानेवारी, पहाटे ७ वा.
 
जज म्हणाले होते- गुन्हेगारांना कायदा जोवर जगण्याचा अधिकार देतो, ताेवर फाशी देणे पाप आहे. दुसरे वाॅरंट १७ जानेवारी... फाशीची तारीख : १ फेब्रुवारी, पहाटे ६ वाजता 

निर्भयाची आई म्हणाली होती- ७ वर्षांपासून तारखांवर तारखा मिळत आहेत. यंत्रणा फक्त दोषींचेच ऐकून घेते. 
 

तिसरे वाॅरंट १७ फेब्रुवारी... फाशीची तारीख : ३ मार्च, पहाटे ६ वाजता 

दोषींचे वकील ए.पी. सिंह म्हणाले, - मी लिहून देतो की ३ मार्चला फाशी होणार नाही.  (अगदी असेच घडले...)

बातम्या आणखी आहेत...