आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Rape Case Curative Petition | Nirbhaya Convict Mukesh Singh Curative Petition Supreme Court Hearing Today Updates On Delhi Gang Rape And Murder Case Convict Curative Petition

दोषी मुकेशकडे आता कुठलाच पर्याय नाही; दया याचिका रद्द करण्याला दिलेले आव्हान सुप्रीम कोर्टाने फेटाळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील 4 दोषींपैकी एक मुकेश सिंहकडे आता फाशीपासून वाचण्यासाठी कुठलाही पर्याय राहिलेला नाही. दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात मुकेशने दाखल केलेली याचिका बुधवारी सुप्रीम कोर्टाने धुडकावून लावली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारी रोजी मुकेशचा दयेचा अर्ज नाकारला होता. त्याने यावर फेरविचार करण्यासाठी 19 जानेवारीला मागणी केली होती. त्यातच सत्र न्यायालयाने दोषींच्या विरोधात मृत्यूपत्र जारी केले आहे. त्यानुसार, चारही आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवले जाणार आहे. पहिले मृत्यूपत्र (डेथ वॉरंट) 22 जानेवारी रोजी जारी करण्यात आले होते.


सुप्रीम कोर्टाने सांगितले, "गृह मंत्रालयाने दया याचिकेसोबत संबंधित कागदपत्रे राष्ट्रपतींसमोर मांडली होती. यामध्ये कनिष्ठ न्यायालयांचे निकाल, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील निकाल सर्वांचा समावेश होता. दोषींना तुरुंगात यातना दिल्या जात असल्याचे आरोप त्यांच्या वकिलांकडून केले जात आहेत. परंतु, त्यामध्ये कुठल्याही प्रकारते तथ्य सापडले नाहीत. दया याचिकेवर जलद निर्णय घेतला याचा अर्थ असा होत नाही की राष्ट्रपतींनी आपल्या विवेकाधीन अधिकाराचा वापर केलेला नाही." यासोबतच आणखी एक दोषी अक्षय ठाकूरने सुप्रीम कोर्टात मंगळवारी रात्री क्यूरेटिव्ह पेटिशन दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...