• Home
  • National
  • Nirbhaya Rapists Death Warrant | Nirbhaya Gangrape Case Convict Vinay Sharma Death Penalty Mercy Petition Supreme Court Hearing Latest News and Updates On Delhi Gang Rape And Murder Case

निर्भया प्रकरण / दोषींच्या वेग-वेगळ्या फाशीवर सुनानवणी करताना जस्टिस भानुमती बेशुद्ध! सुनावणी पुढे ढकलली

मुकेश, विनय, अक्षयसाठी सर्व मार्ग बंद; केवळ पवन करून शकतो क्यूरेटिव्ह, दया याचिका

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 06:07:00 PM IST

नवी दिल्ली - दया याचिकेवर राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विनय शर्माची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. यानंतर निर्भयाच्या सर्वच दोषींच्या वेग-वेगळ्या फाशीवर सुनावणी सुरू झाली. या दरम्यान, जस्टिस आर भानुमती अचानक बेशुद्ध पडल्या. डायसवर बसलेल्या इतर न्यायाधीश आणि स्टाफच्या मदतीने त्यांना वेळीच त्यांच्या चेंबरमध्ये नेण्यात आला. त्यानंतर खंडपीठाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच आदेश नंतर जारी केले जाणार असे स्पष्ट केले. "जस्टिस आर भानुमती यांना ताप होती. चेंबरमध्येच डॉक्टरांनी तपास करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. वकिलांचे युक्तिवाद ऐकत असताना त्यांची प्रकृती खालवली आणि त्या बेशुद्ध पडल्या होत्या." अशी माहिती महाधिवक्ते तुषार मेहता यांनी दिली.


तत्पूर्वी निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माच्या याचिकेवर सुनावणी करताना जस्टिस आर भानुमति, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एएस बोपन्ना यांच्या बेंचने सांगितले होते, की राष्ट्रपतींनी विनयची दया याचिका फेटाळून लावताना त्याचे मेडिकल रिपोर्टसह सर्वच पैलू तपासून पाहिले होते. विनय मनोरुग्ण असल्याचा दावा करण्यात आला होता. तो देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. सोबतच, मेडिकल रिपोर्टनुसार दोषीची मानसिक अवस्था सामान्य असल्याचे देखील नमूद केले.

X