आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya: Vinay Sharma Nirbhaya Case Mercy Petition Latest News Updates On Nirbhaya Case Convict

दोषीने दया याचिका परत घेण्याची केली मागणी, याचिकेवर स्वाक्षरी आपली नसल्याचा केला दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज पाठवणारा निर्भया प्रकरणातील एकमेव दोषी होता विनय - Divya Marathi
राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज पाठवणारा निर्भया प्रकरणातील एकमेव दोषी होता विनय

नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 दोषींपैकी एक विनय शर्माने राष्ट्रपतींकडे दिलेला दयेचा अर्ज परत घेण्याची मागणी केली आहे. निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दया याचना करणारा तो एकमेव दोषी होता. विनयने शनिवारी दावा केली, की याचिकेवर करण्यात आलेली स्वाक्षरी त्याची नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गृह मंत्रालयाने दया याचनेवर अंतिम निर्णयासाठी अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. सोबतच, केंद्र सरकारने ही याचना फेटाळण्याची मागणी सुद्धा केली आहे.

दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण समोर आले होते. यातील एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली. तर उर्वरीत चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. यातील 3 दोषींनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळून लावण्यात आली. यापूर्वी दिल्ली सरकारने सुद्धा दोषींचा दयेचा अर्ज नकारला. आता राष्ट्रपतींचा निर्णय समोर येताच नराधमांच्या फाशीचा मार्ग मोकळा होणार आहे.

तिहाड मुख्यालयाने दोषींबद्दल पाठवले होते गुप्त पत्र
तिहार कारागृह मुख्यालयाने याच वर्षी 28 ऑक्टोबर रोजी तिन्ही तुरुंगांच्या अधीक्षकांना गुप्त पत्र पाठवले होते. या प्रकरणातील आरोपी मुकेश आणि अक्षय तिहारच्या जेल क्रमांक 2 मध्ये, विनय जेल क्रमांक 4 आणि पवन जेल क्रमांक 14 (मंडोली जेल) मध्ये बंद आहे. मुख्यालयाने पत्रामध्ये सांगितले, की चारही दोषींना मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे. यांच्याशी संबंधित कुठलेही प्रकरण आता सुप्रीम कोर्टात लांबणीवर नाही. मुख्यालयाने 7 दिवसांच्या आत सर्वच तुरुंगांचे उत्तर मागितले होते. यानंतर 29 ऑक्टोबर रोजी चारही दोषींना हिंदी आणि इंग्रजीत लेखी नोटीस देण्यात आली होती. तुरुंगातील सुत्रांच्या माहितीनुसार, दोषींना पत्र दिल्याचे रेकॉर्ड सुद्धा आहेत.

बातम्या आणखी आहेत...