आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya's Mother Said 'I Want To See Those Devils Hanging With My Own Eyes, Will Ask Permission From The Court'

निर्भयाची आई म्हणाली - 'त्या नराधमांना फासावर लटकताना स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे आहे, कोर्टाकडून परवानगी मागेन'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्भयाची आई आशा देवी आणि दुसऱ्या बाजूला निर्भयाच्या घराबाहेर लोकांनी लावलेले बॅनर. - Divya Marathi
निर्भयाची आई आशा देवी आणि दुसऱ्या बाजूला निर्भयाच्या घराबाहेर लोकांनी लावलेले बॅनर.
  • गुन्हेगारांच्या डेथ वॉरंटनंतर घरी पाेहोचलेल्या निर्भयाच्या पालकांचे टाळ्यांनी स्वागत
  • गुन्हेगारांना फाशी देईपर्यंत रोज काढला जाणार कँडल मार्च

​​​​​​नवी दिल्ली : नराधमांचे डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर बुधवारी निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या की, दोषी २२ जानेवारीपर्यंत आपल्या बचावाचे आटोकाट प्रयत्न करतील. मी ७ वर्षांपासून संघर्ष करत आले असून तो २१ जानेवारीपर्यंत कायम राहील. माझी एक इच्छा आहे. बहुतेक ती कायदेशीररीत्या शक्य नसेल पण त्यासाठी मी एकदा तरी प्रयत्न करेनच. लेकीच्या गुन्हेगारांना माझ्या डोळ्यांसमोर फासावर लटकल्याचे मला पाहायचे आहे. यासाठी मी तुरुंग प्रशासन आणि कोर्टाकडे अर्ज करणार आहे.

दुसरीकडे, दिल्लीच्या द्वारका सेक्टरमधील त्यांच्या घरासमोर वेगळेच दृश्य होते. निर्भयाचे कुटुंबीय कोर्टातून परत येण्याच्या प्रतीक्षेत अपार्टमेंटचे लोक तीन तास गेटवरच उभे होते. रात्री ९.३० वाजता ते येताच लाेकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, कँडल मार्च काढला. लोकांनी समोरील चौकाला निर्भयाचे नाव देण्याची मागणी केली. अखेर निर्भयाच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून रात्री १२ वाजता जमाव पांगला. आशादेवी म्हणाल्या, लोकांनी बाहेर एक बॅनर लावले असून त्यावर जोवर चारही नराधमांना फाशी होणार नाही तोवर राेज कँडल मार्च काढला जाईल, असे लिहिले आहे. लोकांचे प्रेम पाहून माझे डोळे पाणावले. न्यायाच्या लढ्यात सोबत करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

आज हजारो मुलींची आई झालेय

आशादेवी म्हणाल्या, मी एक सर्वसामान्य गृहिणी होते. पती आणि मुलांपर्यंत माझे आयुष्य मर्यादित होते. कोर्ट-कचेऱ्यांचा कधी संबंधही आला नाही. मात्र मुलीच्या जखमा पाहिल्या तेव्हा नखशिखांत हादरून गेले. नराधमांनी तिचे पूर्ण शरीर दातांनी चावलेले हाेते. ती रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत असताना तिच्या वेदनांनी मीही मजबूत होत गेले. मी एक मुलगी गमावली. पुन्हा कुणासोबत असे घडू नये म्हणून निर्भया ज्योती ट्रस्ट स्थापन केली. अनेक मुलींना मदत केली. त्या मला जेव्हा आई संबोधतात तेव्हा खूप बळ मिळते. आता माझा लढा देशातील सर्वच लेकींच्या सुरक्षेसाठी आहे.