आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी तयार केलेले निर्भीक रिव्हाॅल्व्हर, पाच वर्षांत २५०० विक्री झाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - सात वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या बहुचर्चित निर्भया अत्याचार प्रकरणानंतर कानपूरच्या शस्त्रास्त्र कारखान्यात महिलांसाठी ‘निर्भीक’ हे विशेष रिव्हाॅल्व्हर तयार केले जात आहे. महिलांनी त्याला चांगली पसंती दिली आहे. आतापर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश व हरियाणात २५०० रिव्हाॅल्वरची विक्री झाली. या रिव्हाॅल्वरचे वजन ५०० ग्रॅम व किंमत १.२० लाख रुपये आहे. या कारखान्याच्या प्रतिनिधीने आंतरराष्ट्रीय पाेलिस एक्स्पाेमध्ये सांगितले, निर्भीक रिव्हाॅल्व्हरला एक मजबूत व स्वसुरक्षेचे शस्त्र म्हणून लाँच केले आहे. महिला हे रिव्हाॅल्व्हर पर्समध्येही ठेवू शकतात. लाँचिंगच्या आधीच ५ वर्षांत २,५०० रिव्हाॅल्व्हरची विक्री झाली. कमी वजन आणि दुरुस्तीसाठी कमी येणारा खर्च हे या रिव्हाॅल्व्हरचे वैशिष्ट्य आहे,’ असे ते सांगतात.

 

सामान्य रिव्हाॅल्व्हरपेक्षा निर्भीकची किंमत जास्त
कारखान्यातील अधिकाऱ्याच्या मते, निर्भीकची किंमत जास्त असली तरी त्याला चांगली मागणी येत आहे.
सामान्य रिव्हाॅल्व्हरची किंमत जिथे १ लाख रुपयांपर्यंत असते त्या तुलनेत निर्भीकची किंमत १.२० लाख रुपये आहे. जीएसटी धरून ही किंमत १.४० लाख रुपयांपर्यंत जाते.  हे रिव्हाॅल्व्हर १५ मीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य सहज भेदू शकते, असे या कारखान्यातील तज्ञांचे मत आहे.