Home | Business | Industries | nirlep-to-launch-new-product

निर्लेपची तीन नवी उत्पादने येणार

दिव्य मराठी टीम | Update - May 20, 2011, 01:56 PM IST

निर्लेप उद्योग समूहाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना तीन नवे उत्पादने बाजारात आणण्याचे ठरविले आहे.

  • nirlep-to-launch-new-product

    औरंगाबाद - निर्लेप उद्योग समूहाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना तीन नवे उत्पादने बाजारात आणण्याचे ठरविले आहे. ऍसिलिक सेलॅक, ऐबोनी सखी आणि मावेन, अशी त्या उत्पादनांची नावे आहेत. संसारोपयोगी वस्तू बाजारात आणणारी ही कंपनी आता एक ब्रँडनेम कंपनी म्हणून पुढे आली आहे. निर्लेपची स्थापना १९६८ साली करण्यात आली होती. त्यावेळी ही कंपनी वैद्यकीय क्षेत्रातल्या वस्तू तयार करायच्या. १९६८ च्या दरम्यान मात्र निर्लेप कंपनीने किचनमधील भांडे बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर निर्लेप कंपनी सातत्याने नवनवे उत्पादने बाजारात आणत आहे. हार्ड ऍनेडाईज्ड, ईनव्हेलेव्हर ,प्रेशर कुकर या भांड्यांनी निर्लेपला संसारोपयोगी भांडी बनविणाऱया क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

Trending