आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काल्पनिक जाहिरात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मला देशमुख
मध्यंतरी टीव्हीवर  एक जाहिरात पाहिली. त्यात एक मुलगी, तिची आई आणि त्या आईची आई एकमेकींच्या केसाला तेल लावत असतात. नात आईला  म्हणते, आई मला तुझ्या  हातची ती स्पेशल भाजी  खायची आहे, तर आई सरळ मोबाइलचे बटण दाबते आणि भाजी ऑर्डर  करते. सगळेच खुश. आजी, आई, नात आणि डिलिव्हरी बाॅयही. दोन मिनिटे छान करमणूक झाली. पण या सगळ्यात भाजी करत असताना आईची पूर्वतयारी, धडपड, भाजीचा घरभर पसरलेला घमघमाट, सगळेच सुटलेले  असते.     

आपल्याकडे कशाचीही जाहिरात केली जाते  हेच खरे. सर्दी, खोकला, डोकेदुखी यापैकी कोणताही आजार, व्याधी दोन मिनिटात बरी होणारी असती तर ती मुळात  झालीच नसती. कोणताही  क्रिकेटपटू अॅनासिन घेतो आणि ते रक्तापर्यंत पोहोचायच्या आत चौकार मारतो. भराभर धावा काढून सेंच्युरी  करतो. ऑर्डर पूर्ण करायची म्हणून सारखं वाकून कंबर दुखते म्हणून पती आयोडेक्स लावतो आणि ते सुकायच्या आत ती राहिलेले काम पूर्ण करते किंवा पाय मुरगळलेला धावपटू  शर्यतीत पहिला येतो. यातून असे वाटते की, माणसाने जसा कायदा हातात घेऊ नये त्याप्रमाणे मेडिसीनसुद्धा. माझ्या आठवणीप्रमाणे  सुप्रसिद्ध अभिनेते व नाक-कान-घसा तज्ञ  डाॅ. श्रीराम लागू यांनी वेदनानाशक गोळीची जाहिरात केली होती. परिणामी त्यांना प्रॅक्टिस बंद करावी लागली. म्हणून हा असा कुठलाही अतिरेक वाईटच आणि आपण मालिका पाहत असताना जाहिरातीच्या प्रसारणामुळे मालिकांचे तुकडे पाहावे लागतात. एवढेच नाहीतर जाहिरातींमुळे दहा ते बारा मिनिटांच्या मालिकेला पंचवीस मिनिटे पाहावे लागते. आता तर मालिकेतल्या अभिनेत्रीही प्रॉडक्टच्या जाहिराती करू लागल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...