आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीतारमण यांनी 17 वर्ष जुने रेकॉर्ड मोडले, जसवंत सिंह यांनी 2003 मध्ये 2 तास 13 मिनिटात अर्थसंकल्प मांडला होता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी 2020-21 साठी अर्थसंकल्प सादर करताना 17 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. सीतारमण यांनी सर्वात मोठे अर्थसंकल्प भाषण केले. यापूर्वी जसवंत सिंह यांच्या नावे हा रेकॉर्ड होता. जसवंत सिंह यांनी 2003 मध्ये अर्थसंकल्प मांडण्यासाठी 2 तास 13 मिनिटांचा वेळ घेतला होता. यासोबतच इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारमण सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला अर्थमंत्री आहेत.

शब्दांच्या हिशोबाने सर्वात मोठ्या अर्थसंकल्प भाषणाचा रेकॉर्ड मनमोहनसिंग यांच्या नावावर आहे. त्यांच्या 1991 मधील अर्थसंकल्प भाषणात 18,177 शब्द होते. या बाबतीत अरुण जेटली दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. जेटली यांचे 2017 मधील अर्थसंकल्प भाषण 18,604 शब्दांचे होते. 2015 मध्ये 18,122 शब्द 2018 मध्ये 17,991 आणि 2014 मध्ये 16,528 शब्दांचे होते.

हिरूभाई यांनी सर्वात छोटे अर्थसंकल्प भाषण केले होते
1977 मध्ये हिरूभाई एम पटेल यांनी अंतरिम बजेट सादर करताना 800 शब्दांचे सर्वात छोटे भाषण केले होते. मोरारजी देसाई यांनी सर्वात जास्त 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांच्यानंतर पी चिदंबरम यांनी 9 वेळेस अर्थसंकल्प मांडला.