आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nirmala Sitharaman On Bank Deposit Insurance Cover Over Budget 2020 Announcement; Deposit Insurance Raised To Rs 5 Lakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

27 वर्षानंतर बँक डिपॉजिट विमा कव्हर 1 लाखावरुन 5 लाख होईल; पीएमसी बँक घोटाळ्यानंतर सरकारची घोषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प भाषणात विमा कव्हरची रक्कम पाच पट करण्याची घोषणा केली
  • काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पीएमसी बँकेक घोटाळा झाला होता, यात हजारो करदात्यांचे पैसे बुडाले होते

नवी दिल्ली- सामान्य नागरिकांच्या बँक डिपॉजिट्सच्या सुरक्षेवर केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2020 मध्ये एक महत्वाची घोषणा केली आहे. अर्थसंकल्प प्रस्तावात सांगितल्यानुसार, आता बँकेत जमा पैशांवरील विमा कव्हर एक लाखांपरुन पाच लाखांवर केला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पीएमसी सहकारी बँकेत घोटाळा झाला होता. तेथील हजारो ग्राहकांचे पैसे बुडाले होते. यानंतर बँक डिपॉजिट्सच्या विमा कव्हरवरुन सरकार आणि रिजर्व्ह बँकेवर खुप टीक झाली होती. सध्या असलेला 1 लाखांचा विमा कव्हर 1993 मध्ये लागू करण्यात आला होता. म्हणजेच आता 27 वर्षानंतर हा विमा कव्हर 5 लाखांवर आणला आहे.

सध्या काय होत आहे? 

आतापर्यंत कोणतीही बँक बुडीत गेल्यावर ग्राहकांना फक्त 1 लाखांचा विमा कव्हर मिळत होता. उदा. जर एखाद्या ग्राहकाच्या खात्यात 10 लाख रुपये आहेत आणि बँक बुडीत निघाली तर त्या ग्राहकाला फक्त 1 लाख रुपये परत मिळत होते. ‘डिपॉजिट इन्श्योरेंस अँड क्रेडिट गारंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) ने जमा रकमेवरील विमा कव्हर 1 लाख रुपये ठरवले असल्याने असे होत होते. डीआयसीजीसी आरबीआयचा सहाय्यक उपक्रम आहे.

आता काय होईल?

समजा ग्राहकाच्या खात्यात 10 लाख रुपये आणि कोणत्याही कारणामुळे बँक बुडीत निघाली तर त्या ग्राहकाला 5 लाख रुपये मिळतील. डीआयसीजीसी ग्राहकांकडून या विम्यावर कोणतेही प्रीमियम घेत नाही, बँक स्वतः हा प्रीमियम भरते. डिपॉजिट गॅरंटी फक्त बँक बंद झाल्यावरच मिळते.