Home | Sports | Cricket | Off The Field | Nita Ambani made an impressive celebration with the IPL trophy and '?Antilia'

IPL ट्रॉफी घेऊन 'अँटीलियावर' नीता अंबानीने केले जोरदार सेलिब्रेशन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 04:53 PM IST

निता अंबानीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

 • Nita Ambani made an impressive celebration with the IPL trophy and '?Antilia'

  हैदराबाद (एंटरटेंमेंट डेस्क) - येथे खेळण्यात आलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये मुंबईने रोमाचंक विजय मिळवला. यादरम्यान नीता अंबानी मैदानावर टीमचा उत्साह वाढवत होत्या. एवढेच नाही तर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, यात त्या विजयासाठी मंत्रांचा जाप करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण टीमने या विजयाचे खास सेलिब्रेशन केले आहे. विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ मुकेश अंबानीच्या 'अँटिलिया'वर पोहोचला. यावेळी नीता आणि आकाश अंबानी आपल्या संघासोबतच होते. या दरम्यान निता अंबानींचा आनंद गगनात मावत नव्हता.

  ट्रॉफीसोबत घेऊन नीता अंबानी यांनी मीडियासमोर पोझ दिल्या. यादरम्यान त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि गोल्डन ब्राऊन प्लाजो परिधान केला होता. यावरीस ब्लू कलरच्या ओढणीमुळे त्यांच्या सौंदर्याला चार-चांद लागले. या कम्लीट लुकमध्ये निता अंबानी नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होत्या.

  अंतिम सामना पाहण्यासाठी निता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि अनंत अंबानी पोहचले होते. विजयानंतर नीता आणि राधिका मर्चेंट ट्रॉफी घेऊन आनंद साजरा करताना दिसल्या. नंतर आकाश अंबानीने ट्रॉफी घेऊन एअरपोर्टवर कॅमेराकडे बघून आपला आनंद व्यक्त केला. यादरम्यान आकाशने चेक्स शर्ट तर त्याची पत्नी श्लोका मेहताने फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला होता.

Trending