आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार नितेश राणे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कणकवली - महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रकाश शेडेकर यांना चिखलाची अंघोळ घालून बांधून ठेवल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह १८ जणांना न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी राणे यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही राणे यांनी आक्रमकपणा दाखवत पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षकालाही जाब विचारला होता. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. कणकवलीजवळ मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चिखल साचला आहे. याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. यासाठी राणे यांनी गुरुवारी आंदोलन करून शेडेकर यांना चिखलाची अंघोळ घालून बांधून ठेवले होते. त्यानंतर नितेश यांच्या कृत्याची त्यांचे वडील नारायण राणे यांनी माफी मागितली होती. मात्र, त्यानंतरही नितेश यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...