Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Nitin Gadkar faints out while Rahuri Krishi Vidyapeeth

कॉन्व्होकेशन गाऊनमुळे गुदमरल्यासारखे झाले, त्यामुळे स्टेजवर भोवळ आली-नितीन गडकरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 02:53 PM IST

गडकरी यासपीठावर कोसळत असताना राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले.

  • शिर्डी- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे आपल्याला गुदमरल्यासारखे झाले. त्यामुळेच भोवळ आली. आपली डॉक्टरांनी तपासणी केली. ब्लड शुगर व ब्लडप्रेशर सर्व ठीक आहे. आपण साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला जात असल्याची माहिती स्वत: केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी शिर्डीत पत्रकारांना दिली.

    राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आले होते. समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. गडकरी यांनी हा पोशाख घातल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. समारंभ बंदिस्त सभागृहात असल्याने गडकरींना अस्वस्थ वाटू लागल्याने काही वेळातच त्यांना स्टेजवर भोवळ आली. त्यानंतर तातडीने डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. सर्वप्रकारच्या तपासण्याही केल्या. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने शिर्डीत आले. साईबाबांचे दर्शन घेऊन समाधीवर शाल चढवली. साईबाबांच्या दर्शनानंतर नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी अल्पसा संवाद साधला. दीक्षांत समारंभात अापल्याला अस्वस्थ वाटून भोवळ आल्याचे त्यांनी सांगितले. माझा रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाणही प्रमाणात अाहे. आपण नेहमीसारखे ठणठणीत असून कोणीही काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर गडकरींचा ताफा शिर्डी विमानतळाकडे रवाना झाला. दुपारी 3.35 वाजता विशेष खासगी विमानाने ते नागपूरला रवाना झाले.

Trending