आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतांच्या राजकारणासाठी ‘नागरिकत्व’कायद्याबाबत काँग्रेसकडून दिशाभूल, गडकरींचा विरोधकांवर आरोप

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • संघ परिवारातर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन

नागपूर- ‘नागरिकत्व सुधारणा कायदा हा कुठल्याही भारतीय व्यक्तीच्या िवरोधात नाही. केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून या कायद्याबाबत मुस्लिम समाजाची दिशाभूल केली जात आहे.  या कायद्यासंदर्भात होत असलेल्या अपप्रचाराला कुणीही बळी पडू नये’, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात बोलताना केले.मोदी सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद, भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अन्य संघटनांच्या वतीने लोकाधिकार मंचाच्या बॅनरखाली रविवारी उपराजधानीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघाचे स्थानिक पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे नेते सहभागी झाले होते. मोर्चात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात घोषणाही देण्यात आल्या. यशवंत स्टेडियम येथून सुरु झालेला हा मोर्चा संविधान चौकात पोहोचल्यावर तेथे या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. मतपेढीच्या राजकारणासाठीच नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी देशात भ्रम पसरविण्याचे काम काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सुरु असल्याचा आरोप करून गडकरी म्हणाले की, ‘हा कायदा कुठल्याही विशिष्ट समाजाच्या विरोधात अजिबात नाही. शरणार्थी म्हणून भारतात आश्रयाला आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातील अत्याचारग्रस्त अल्पसंख्यक समाजांना सन्मानाने देशात नागरिकत्व प्रदान करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्याचवेळी देशात घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्याचे प्रयोजन या कायद्यात आहे. त्यामुळे भारताचे नागरिक असलेल्या कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला या कायद्याचे भय बाळगण्याचे कारण नाही. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांनुसारच या कायद्याची आखणी झाली आहे’, असे गडकरी म्हणाले. 

या जाहीर सभेत संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह गोविंदगिरी महाराज यांचीही भाषणे झाली. राष्ट्रगीताने या जाहीरसभेची सांगता झाली. 

बातम्या आणखी आहेत...