आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरी यांना लो ब्लड शुगरमुळे अचानक आली भोवळ, जाणून घ्या याचा शरीरावर कसा पडतो प्रभाव आणि बचावाचे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी येथील कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. परंतु नितीन गडकरी यांना भोवळ येण्यामागचे कारण लो ब्लड शुगर सांगण्यात येत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरावर याचा कसा परिणाम होतो आणि या समस्येपासून दूर राहण्याचे उपाय.


रक्तामध्ये साखरेचे संतुलित प्रमाण नसल्यास याचा मेदूंवर वाईट प्रभाव पडतो. या व्यतिरिक्त वजन वाढणे, चक्कर येणे, डोकेदुखी, मांसपेशीमध्ये त्रास, चिडचिड होणे अशा आजारांचा धोका राहतो.


नर्व्हस सिस्टीमवर प्रभाव - लो ब्लड शुगरमुळे शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांवर प्रभाव पडतो.  नर्व्हस सिस्टीम कमजोर झाल्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवांपर्यंत पोषक तत्त्व आणि ऑक्सिजनचा प्रवाह योग्यप्रकारे होत नाही.


पायांवर प्रभाव - लो ब्लड शुगरमुळे रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे याचा प्रभाव पायावर पडतो. नर्व्हस सिस्टीम बिघडल्यामुळे पायांमध्ये वेदना, सूज आणि पाय सुन्न पडण्याची समस्या निर्माण होते. यावर त्वरित उपचार न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
 

डोळ्यांवर प्रभाव - ब्लड शुगरची समस्या असल्यास डोळ्यांची शक्ती अंधुक आणि कमजोर होऊ लागते. रुग्णाने याकडे दुर्लक्ष केले तर अंधत्वसुद्धा येऊ शकते. याचा डोळ्यांच्या रॅटीनावर प्रभाव पडतो.


त्वचेवर प्रभाव - ब्लड शुगर संतुलित नसल्यास शरीरातून तरलपदार्थ निघू लागतात आणि यामुळे त्वचा शुष्क होते आणि खाज सुटते. कधीकधी त्वचेवर चाल चट्टे दिसू लागतात. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी प्यावे यामुळे शरीरातील तरलपदार्थ कमी होणार नाहीत.


लो ब्लड शुगरपासून दूर राहण्याचे उपाय
- लो ब्लड शुगरपासून दूर राहण्याचा उत्तम उपाय म्हणजे संतुलित आणि वेळेवर जेवण. यामुळे बाहेरच्या अन्नाऐवजी घरातील जेवण नियमितपणे घ्यावे.
- प्रत्येक चार तासानंतर काही न काहीतरी खावे. काधीकधी वेळ न मिळाल्यामुळे तुम्ही काही खाऊ शकत नाही. कामाचा ताण किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला वेळेवर जेवण मिळत नाही. अशावेळी स्वतःजवळ खाण्यासाठी एखादा स्नॅक्स ठेवावा.
- आपल्या औषधीनुसार आहार घ्यावा. जेवणात उशीर करू नये.
- नियमितपणे ब्लड शुगरची तपासणी करावी. 

 

बातम्या आणखी आहेत...