आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले.. मला पंतप्रधानपदाची लालसा नाही, नितीन गडकरींचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई- कुवतीपेक्षा मला खूप जास्त मिळाले आहे. त्यामुळे मला पंतप्रधानपदाचा लालसा नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले आहे. दरम्यान, गडकरींनी आपल्या काही जाहीर सभा तसेच मुलाखतींमध्ये मोदींविरोधी वक्तव्य केल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर गडकरींनी स्पष्टीकरण दिले.

 

गडकरी एका वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी सांग‍ितले की, मला माझ्या कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. मला पंतप्रधानपदाचीही लालसा नाही. माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ लावून चुकीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मी जे काही बोलतो, माध्यमे त्यापैकी थोडाफार भाग कापून प्रसिद्ध करतात. त्यातून गैरअर्थ काढले जातो.

 

माध्यमांवर नाराज..

माध्यमे आणि माध्यमांच्या प्रतिनिंधींवर नाराज असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. मी जे वक्तव्य करत नाही, ते माझ्या नावाने प्रसिद्‍ध केले जाते.

 

बातम्या आणखी आहेत...