Home | National | Delhi | Nitin Gadkari: Union minister Nitin Gadkari says If you want good services, you have to pay for it

Toll / रस्ते चांगले हवे असतील तर टोल भरावाच लागेल, ते आयुष्यभर बंद ठेवता येणार नाही!

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 16, 2019, 03:12 PM IST

लोकसभेत टोल नाक्यांवर बोलले केंद्रीय रस्ते परिवहन नितीन गडकरी

 • Nitin Gadkari: Union minister Nitin Gadkari says If you want good services, you have to pay for it

  नवी दिल्ली - रस्ते चांगले हवे असतील तर टोल भरावाच लागेल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर टोल नाके आयुष्यभरासाठी बंद ठेवता येणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेत मंगळवारी टोल नाक्यांवर विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. गडकरी म्हणाले, टोलचे दर कमी किंवा जास्त होऊ शकतात. मी टोलचा जन्मदाता आहे. जर तुम्हाला चांगले रस्ते हवे असतील तर किंमत मोजावीच लागेल. सरकारकडे यासाठी पुरेसा पैसा नाही.


  टोलच्या रकमेचा असा होत आहे वापर...
  रस्ते परिवहन मंत्रालयासाठी अनुदानाच्या मागणीवर चर्चा घेण्यात आली. त्यामध्येच विचारलेल्या प्रश्नांची गडकरींनी उत्तरे दिली. गेल्या 5 वर्षांत सरकारने 40 हजार किमी महामार्ग बांधले आहेत. काही खासदारांनी देशातील विविध भागांत गोळा केल्या जाणाऱ्या टोलच्या रकमेवर चिंता व्यक्त केली. त्यावर गडकरी म्हणाले, ज्या भागातील लोक टोल देऊ शकतात त्याच ठिकाणांवरून टोल गोळा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या रकमेतून ग्रामीण आणि डोंगराळ भागांत रस्ते बांधण्यासाठी वापर केला जात आहे.


  मुंबई-दिल्ली ग्रीन एक्सप्रेस-वे कामात 16 हजार कोटी रुपये वाचणार
  गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे, रस्ते परिवहन मंत्रालय दिल्ली ते मुंबई दरम्यान ग्रीन एक्सप्रेस-वे बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून दिल्ली ते मुंबईचा प्रवास 12 तासांत पूर्ण केला जाऊ शकेल. हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या मागास आणि आदिवासी भागांतून जाणार आहे. यातून जमीन अधिग्रहणाचे 16 हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

Trending