माेदी जगातील प्रमुख नेत्यांमधील एक नाव! (नितीन गडकरी )
दिव्य मराठी | Update - Sep 18, 2016, 01:55 AM IST
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र माेदी यांनी भारताची प्रतिष्ठा जगात मिळविली. एक काळ असा हाेता की, भारतीय नेतृत्वाला जगातील अनेक देशांमध्ये मानाचे स्थान नव्हते, परंतु अाज जगाच्या प्रमुख नेत्यांमध्ये माेदींचे नाव घेतले जाते. देशाचे नाव जगभर पाेहोचवताना माेदींनी इतर देशांशी असलेले भारताचे संबंध अधिक बळकट केले. त्यासाेबतच दहशतवाद व काळ्या पैशाविरुद्ध अावाज उठविला. चीन व अमेरिका दाेघांशी उत्तम संबंध ठेवून दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध जगातील जनमत उभे केले. दहशतवादाविरुद्ध लढण्याची गरज कशी अाहे हे जगाला समजावून सांगणारे पंतप्रधान नरेंद्र माेदीच अाहेत! त्यांच्या नेतृत्त्वात भारताचे भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही. भारत बदलताेय. अागामी काळ हा भारतीयांचा असेल यात शंका नाही.
-
ज्ञा न, विज्ञान, तंत्रज्ञान अाणि संशाेधन याबाबी अर्थनीतीशी जाेडत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा अनेक गाेष्टींना प्राेत्साहन दिले. देशात जलदगतीने अर्थव्यवस्थेत बदल घडत अाहेत.
मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थन करताना त्यांनी गरिबांचा विचार केला. प्रधानमंत्री जनधन याेजनेतून २१ काेटी ८० लाख बँक खाती उघडलीत, याअाधी केवळ साडेतीन लाख बँक खाती हाेती. या सर्व खातेधारकांना जीवन विमा मिळाला. पंतप्रधान पीक विमा याेजनेद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना सुरक्षा दिली. केंद्र सरकारने सिंचनासाठी १ लाख काेटी रुपये दिलेत त्यातून राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले जात अाहेत. त्यामुळे अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला अाहे. दुसरीकडे त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक याेजनेला प्राधान्य दिले अाहे. पेंशन, इन्शुरन्स, रेशनकार्ड अाणि गॅस सिलिंडर यातून केंद्र सरकारची जी सबसिडी वाचली त्यात ५० हजार काेटींची बचत झाली अाहे. माेदींनी सगळ्याचठिकाणी पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त वातावरण व राेजगार निर्मिती यावर भर दिला अाहे.इतर देशांना अापण सॅटेलाईटचे तंत्रज्ञान देत अाहाेत, हे भारताचे माेठे यश अाहे. विज्ञानाचा अाधार घेत माेदींनी देशातील शेतीला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना अाधार दिला व अार्थिक सुधार केलेत. माेठ्या प्रमाणात राेजगाराच्या संधी निर्माण केल्यात, त्यामुळे देशात माेठ्या प्रमाणावर बदलते चित्र दिसत अाहे. हा केवळ पाया अाहे; या पायावर पुढे भक्कम इमारत उभी राहावी याचे ते नियाेजन करीत अाहेत.
हा बदलणारा देश असाच जर पाच वर्ष चालला तर मला विश्वास अाहे अाम्ही लवकरच ११ टक्के जीडीपी गाठू. हा टप्पा गाठला तर चित्र एकदम पालटेल. जीडीपीमध्ये अाैद्याेगिक क्षेत्र किंवा सेवा क्षेत्रापर्यंत मर्यादित न राहता कृषी व ग्रामीण अर्थ नियाेजनाला माेदींनी महत्व दिले अाहे. स्मार्ट शहर झाली पाहिजेत तसेच खेडीही स्मार्ट व्हावीत याचेही नियाेजन हाेत अाहे. सामाजिक, अार्थिक स्थितीचा भान ठेवणारा अाणि अंत्याेदयाचे अार्थिक चिंतन करीत शाेषित, पीडित, दलित, अार्थिक मागासलेल्यांना केंद्रबिंदू मानत धाेरण ठरवणे याला व्हिजनरी द्रष्टा नेता असलेल्या माेदींनी प्राधान्य दिले अाहे.
देशातील उत्पादकता वाढवायची, देशात नवीन राेजगार निर्माण हाेईल, देश संपन्न हाेईल याही दृष्टीने प्रयत्न करणे याचा समन्वय त्यांच्या सर्व प्रयत्नांतून सातत्याने अालेला अाहे. जातीयवाद ते सांप्रदायिकतेपासून मुक्त, सुखी-समृद्ध-शक्तीशाली भारत घडवण्यासाठी ते कटीबद्ध अाहेत. पायाभूत सुविधांसाठी त्यांनी दाेन वर्षात जी कामे करवून घेेतली ती उल्लेखनिय अाहेत. महामार्गांचे जाळे देशभर िवणले जात अाहेत. याअाधीच्या सरकारने दरराेज ४ िक.मी.चे महामार्ग बांधले, अाता अाम्ही २२ कि.मी. पर्यंत पाेहचलाे. डिसेंबर अखेरपर्यंत दरराेज ४२ िक.मी. महामार्ग बांधले जावे असा प्रयत्न अाहे. परंतु ही बाब अवघड असली तरी लक्ष्यप्राप्त करण्याचा त्यांचा विश्वास दांडगा अाहे.
अमेरिकेत नासाचे ६०० अभियंते या तंत्रज्ञानावर काम करीत असलेल्या या प्रवासी कारचा पहिला चाचणी प्रयाेग भारतात हाेऊ शकताे. अलिकडेच यासंदर्भातील बैठक पार पडली अाहे. साऊंड अाणि िफक्सल तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गावर मेट्राेसारखे खांब उभारून त्यावर असलेल्या भव्य पाईप्समधून हायपरलूप कार साेडल्या जाणार अाहेत.
या कारचा ताशी वेग १२२३ िकलाेमिटर राहिल. या कारमध्ये १०० प्रवासी बसू शकतील. हायपरलूपचा चाचणी प्रयाेग मुंबई-पुणे मार्गावर करावा असे सुचविण्यात अाले अाहे. -