आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यातही वन हीच संपत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीन श्रीवास्तव

वने ही आपली संपत्ती आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाने वने टिकवण्याकडे लक्ष द्यायला हवे. आधुनिकीकरणाच्या आजच्या युगात वनांचे तसेच वनक्षेत्राच्या संरक्षणाबाबत पाहिजे तसा विचार मानावाद्वारे होत नसल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. आपल्या फायद्यासाठी वनक्षेत्राचे नुकसान करीत आहे. पर्यावरणावर मानव घाव घालत आहे. त्यामुळे आज जंगणे विराण दिसू लागली आहेत. एक ते सात ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वन्यजीव सप्ताहानिमित्त...
 
वने ही आपली संपत्ती आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाने वने टिकवण्याकडे लक्ष द्यायला हवे. आधुनिकीकरणाच्या आजच्या युगात वनांचे तसेच वनक्षेत्राच्या संरक्षणाबाबत पाहिजे तसा विचार मानावाद्वारे होत नसल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. आपल्या फायद्यासाठी मानव दिवसेंदिवस वनक्षेत्राचे नुकसान करीत आहे. हळूहळू पर्यावरणावर मानव घाव घालत आहे. त्यामुळे आज जंगले विराण दिसू लागली आहेत. याला पूर्णपणे मानवच जबाबदार आहे. 

वनांचा उपयोग मानवाने शिक्षणासाठी, जळतणासाठी, निवासासाठी, लाख, काथ, डिंक, औषध इत्यादी आर्थिक प्राप्तीसाठी केला आहे. लाकडाचा उपयोग वाढल्याने हळूहळू वनांचा संहार होऊ लागला आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि माणूस वनक्षेत्रात वृक्षतोड करून आपला प्रपंच वाढवत आहे. विदर्भातील बुलडाणा हे शहर थंड हवेचे ठिकान म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळा आणि हिवाळा या ऋतूत बुलडाणा परिसरात छान धुके पाहायला मिळते. बुलडाणा परिसरात सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते. अभयारण्याबाबत जाणून घेण्याआधी अभयारण्य म्हणजे काय, हे जाणून घेणे गरजेचे आहे. अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास ‘अभयारण्य’ म्हणता येईल. अभयारण्याचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा काही प्रकारचे जीव आढळून येत नाहीत. यातील काही प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. प्राणी नष्ट होण्यामागील कारण नैसर्गिक तसेच मानवी लोभ होय. 

बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार, हे अभयारण्य ३३०३४.०२ हेक्टर क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातींचे हजारो वन्यजीव आहेत. अत्यंत निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यावरणप्रेमींचे मन वेधणारी अनेक रमणीय स्थळे आहेत. या अभयारण्यातील बिबट्या, हरिण, अस्वल, रोही, तडस, कोल्हा, काळवीट यासारखे अनेक वन्यप्राणी, विविध जातींचे पक्षी तथा वृक्षवल्ली तसेच अनेक औषधोपयोगी वनस्पती अभयरण्य परिसरात दिसून येतात. ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा शहरापासून केवळ १५ किलोमीटर तर खामगावपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य खामगाव, मोताळा व चिखली तालुक्यात वसलेले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून ज्ञानगंगा नदी वाहत असल्याने ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून नावारूपाला अाले आहे. ज्ञानगंगा नदीवर माटरगाव परिसरात धरणाची निर्मिती करण्यात आली असून त्याला ‘ज्ञानगंगा’ धरण संबोधले जाते.

या अभयारण्यात वन्यजीव सोयरे बुलडाणा हे काम करताना मागील काही वर्षांपासून दिसून येत आहे. या अभयारण्यात अनेक पर्यटकांनी दारूच्या काचेच्या बाटल्या फेकल्या होत्या. त्यामुळे वन्यजीवांच्या जिवाला धोका असल्याचे सर्व्हेद्वारे पुढे आलेल्या माहितीवरून २०१६ मध्ये वन्यजीव सोयरेंनी ३५ पोती, तर २०१७ मध्ये २२ पोती दारूच्या बाटल्या श्रमदान करून वन्यजीव सोयरेंनी उचलल्या. आजही ज्ञानगंगा अभयारण्यात काचेच्या बाटल्या काही अपवाद वगळता दिसून येत नाहीत आणि भविष्यात दिसून येऊ नये ही अपेक्षा. आढळल्यास पुन्हा वन्यजीव सोयरे बाटल्या उचलतील यात तिळमात्र शंका नाही. चिनी मांजाला विरोध करण्यासाठी तसेच चिनी मांजा वापरू नये यासाठी जनजागृती करण्यासाठी वन्यजीव सोयरेंनी १४ जानेवारी २०१७ रोजी चित्रफीत सोशल मीडियावर प्रदर्शित केली.  खऱ्या अर्थाने वन्यजीवांचे सोयरे व्हायचा ध्यास बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे चळवळीतील तरुण सार्थक करीत आहेत. वन्यजीव सोयरेच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था आयोजित तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या विशेष सहकार्याने पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन पुणे येथे  सप्टेंबर २०१७ रोजी पार पडले. बौद्धिक, वैचारिक भरण-पोषणासाठी पर्यावरण हा आवश्यक घटक असल्याने वन्यजीव सोयरेची वन, वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी समाजातील सर्व स्तरांत प्रेरणादायी ठरावी, अशी आशा व्यक्त करतो. 
लेखकाचा संपर्क- ९४२१४९४०४०.

बातम्या आणखी आहेत...