आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस-राष्ट्रवादीने हैराण केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसीय सुट्टीवर, नितेश राणेंची टीका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुट्टीवर गेल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवत शिवसेनेवेर टीका केली आहे. हे सरकार गोंधळलेले आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीने 60 दिवसांत मुख्यमंत्र्यांना थकवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तीन दिवसीय सुट्टीवर गेले आहेत. अशाप्रकारची टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पुण्याच्या कामशेतमधल्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने हैराण केल्याने मुख्यमंत्री 60 दिवसांतच थकले


देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना कधी सुट्टी घेतली किंवा नागपूरला सुट्टीवर गेले असे ऐकले का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सहा वर्षांपासून देशाची सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असे ऐकलं का? परंतु हे मुख्यमंत्री 60 दिवसातच थकले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना हैराण केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मध्ये कुठेही स्टॉप न घेता थेट महाबळेश्वरला गेले असल्याचे नितेश राणे म्हणाले. मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री कारकूनासारखे बसलेले असतात


मंत्रिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेत असतात, तर शिवसेनेचे मंत्री टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम करत असून ते मंत्रीमंडळात कारकूनासारखे बसलेले असतात, अशी बोचरी टीका राणे यांनी केली आहे.