आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nityananda Claims He Will Soon Make Cows And Tiger Able To Speak Sanskrit & Tamil

सेक्स सीडी वादात अडकेलेल्या नित्यानंदचा दावा, सॉफ्टवेअरच्या मदतीने संस्कृत-तमिळ बोलणारे गाय-वाघ तयार करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सेक्स रॅकेट प्रकरणामुळे काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेले दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नित्यानंदने आता दावा केला आहे की, तो एक अशी गाय तयार कऱणार आहे, जी संस्कृत आणि तमिळ भाषा बोलेल. या दाव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काय म्हणाला नित्यानंद 

Animals will also talk in future.....our desi guru scientist #Nityananda claims. Simply WOW!.... So we can talk to monkeys and cows in local language.#God are you Watching? pic.twitter.com/Pj9pwbJE2p

— dinesh akula (@dineshakula) September 18, 2018
>> मी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे त्यामुळे गाय, माकड आणि सिंह संस्कृत, तमिळ बोलू शकतली. 
>> मी या सॉफ्टवेअरचे परीक्षण केले आहे. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. फक्त एका वर्षाच्या आत मी हा दावा खरा करून दाखवेल. 
>> मी सिंह, गाय आणि माकडांसाठी एका भाषेचे कार्ड विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. 
>> माझ्याकडे अशी अध्यात्मिक शक्ती आहे, ज्यामुळे गाय, माकड अशा प्राण्यांमध्ये असे काही अंतर्गत अवयव तयार करू शकतो जे फक्त मानवाच्या शरिरात असतात. 
>> प्राण्यांच्या शरिरात व्होकल कार्ड म्हणजे स्वरयंत्र विकसित करणार असल्याचा दावा नित्यानंदने केला. 

 


2010 मध्ये नित्यानंदची एका अॅक्ट्रेसबरोबरची सेक्स सीडी समोर आली होती. त्यानंतर नित्यानंद चर्चेत आला होता. नित्यानंदने 40 वेळा बलात्कार केल्याचा आरोप एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने केला होता. नित्यानंदच्या काही शिष्यांनीही त्याच्यावर आरोप केला होता. एका व्यक्तीवर बळजबरी समलैंगिक संबंध ठेवल्याचा गुन्हाही नित्यानंदवर दाखल झाला होता. जवळपास 40 वर्षे वय असलेल्या नित्यानंदने कमी वयातच स्वतःला संन्यासी जाहीर केले होते. पण आता नव्या लूकमध्ये झळकलेल्या नित्यानंदने हा एक नवा दावा केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...